AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tipu Sultan: मग सर्वात आधी राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल; टिपू सुलतान वादावरून राऊतांनी भाजपला घेरलं

Tipu Sultan: मालाडमधील उद्यानाला टिपू सुलतान (tipu sultan) यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून वाद सुरू आहेत. भाजपने या नामकरणाला विरोध केला आहे.

Tipu Sultan: मग सर्वात आधी राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल; टिपू सुलतान वादावरून राऊतांनी भाजपला घेरलं
sanjay raut raise questions on supreme court decision of quashes indefinite suspension of 12 BJP MLAs
| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 11:25 AM
Share

मुंबई: मालाडमधील उद्यानाला टिपू सुलतान (tipu sultan) यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून वाद सुरू आहेत. भाजपने या नामकरणाला विरोध केला आहे. भाजप नेते राज पुरोहित  (raj purohit) यांनी तर या प्रकरणी पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. भाजपच्या या मागणीचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. टिपू सुलतानचं नाव दिलं म्हणून अस्लम शेख यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजप करत असेल तर भाजपने सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेतला पाहिजे. राष्ट्रपती कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचा गौरव केला होता. त्यामुळे सर्वात आधी भाजपने त्यांचा राजीनामा घ्यावा. मुंबईत काय करायचं हे मुंबई महापालिका आणि राज्य सरकार पाहून घेईल. तुम्ही काळजी करू नका, असा सणसणीत हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. टिपू सुलतान नामकरण प्रकरणी भाजप नेते राज पुरोहित यांनी अस्लम शेख यांचा राजीनामा मागितला आहे. त्याबाबत राऊतांना विचारलं असता राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजप नेत्यांची अशी भाषा असेल तर पहिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल. राजीनाम्याची गोष्ट आहे ना मग तुम्ही राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा मागणार आहात का? कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन या टिपू सुलतानचं सर्वात जास्त गुणगान राष्ट्रपती कोविंद यांनी गायलं होतं. महान योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्य सैनिक वगैरे वगैरे या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावल्या आहेत. लावल्या ना? मग त्यांचा राजीनामा आधी मागावा आणि इथे काय करायचं मुंबईत त्यासाठी महापालिका आणि सरकार समर्थ आहे. तुम्ही काळजी करू नका. उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करू नका, असा दमच राऊत यांनी भरला.

तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही

टिपू सुलतानचं काय करायचं ते आम्ही पाहू. आम्हाला इतिहास कळतो. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाहीत. तुम्ही कशा पद्धतीने इतिहास बदलता, लिहिता, दिल्लीत स्वत:चा इतिहास कसा लिहायला घेतला हे आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतान, हैदर अली, श्रीरंगपट्टणम, मैसूर राज्य सर्व आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतानने काय अत्याचार, अन्याय केला, ब्रिटिशांसोबत कसा लढा दिला हे सर्व आम्हाला माहीत आहे. आम्हाला सांगायची गरज नाही. आंदोलन करू, महाराष्ट्र पेटवू ही भाषा तुमच्या तोंडी असेल तर या पेटवापेटवीतील महाराष्ट्रातील एक्सपर्ट कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. पण आम्ही हे करत नाही, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Rahul Gandhi Twitter : मोदी सरकारच्या दबावामुळं नव्या फॉलोअर्सची संख्या घटली, राहुल गांधीचं ट्विटरला पत्र, पत्रकार परिषद घेत भूमिका मांडणार

Anil Awachat : ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन

Mouny Roy Suraj nambiar wedding : ‘दोन जीवांचं मिलन’, सौंदर्याची खाण मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरजसोबत आज लग्नबंधनात अडकणार!

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...