Anil Awachat : ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सामाजिक जाणीव असलेला आणि बालसाहित्यात मोठं योगदान देणारा साहित्यिक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Anil Awachat : ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन
prominent Marathi author and social activist dr anil awachat passed away
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 10:59 AM

पुणे: वास्तववादी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक, (Marathi author )सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुक्तांगण (muktangan) या संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल अवचट (Anil Awachat)  यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने सामाजिक जाणीव असलेला आणि बालसाहित्यात मोठं योगदान देणारा साहित्यिक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

साहित्यिक अनिल अवचट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर आधी येथील संचेती रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांनी पत्रकार नगर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती. तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती. डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसन क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेसुद्धा असाच पुढे चालू राहील, असं मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना सांगितलं.

वास्तववादी शैलीचा लेखक

अनिल अवचट यांच्या लेखनाची शैली अत्यंत वास्तववादी होती. त्यांनी रिपोर्ताज पद्धतीचे लेखन अधिक केले. त्यांच्या या लेखन शैलीमुळे ते अधिक लोकप्रिय ठरले. विशेष म्हणजे त्यांची शैली साधी, सरळ आणि अनलंकृत अशी होती. अवचट हे मोठे लेखक होते. पण त्यांचा पिंड कार्यकर्त्यांचा होता. समाजसेवकांचा होता. म्हणूनच त्यांनी तरुण पिढीला सावरण्यासाठी मुक्तांगण संस्थेची उभारणी केली होती.

अल्प परिचय

अवचट यांनी पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकशास्त्राची पदवी घेतली होती. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच बीजेमधील मित्र डॉ. कुमार सप्तर्षी आणि डॉ. जब्बार पटेलांसारख्या मित्रांसोबत सामाजिक जागृती, विकास आणि क्रांती या विषयावर त्यांच्या चर्चा चालायच्या. त्यातूनच त्यांची जडणघडण झाली. पुढे या तिन्ही मित्रांनी डॉक्टरीपेक्षा सोडून कला, समाजसेवा आणि राजकीय क्षेत्रात स्वत:ला झोकून दिलं. अवचट यांनी लेखन आणि सामजसेवेला वाहून घेतले होते.

अवचटांची ग्रंथ संपदा

अमेरिका अक्षरांशी गप्पा आपले‘से’ आप्‍त कार्यमग्न कार्यरत कुतूहलापोटी कोंडमारा गर्द छंदांविषयी छेद जगण्यातले काही जिवाभावाचे दिसले ते धागे आडवे उभे धार्मिक People : ‘माणसं’ पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर]] (सहलेखक- विश्राम गुप्ते) पुण्याची अपूर्वाई पूर्णिया प्रश्न आणि प्रश्न बहर शिशिराचा : अमेरिकेतील फॉल सीझन Beyond Work- Visionaries From Another India : ‘कार्यरत’ पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर) मजेदार ओरिगामी मस्त मस्त उतार (काव्यसंग्रह) माझी चित्तरकथा माणसं! मुक्तांगणची गोष्ट पुस्तक : (इंग्रजीत Learning to Live Again) मोर रिपोर्टिंगचे दिवस Learning to live again, “मुक्तांगण” पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर. लाकूड कोरताना वनात..जनात वाघ्या मुरळी वेध शिकविले ज्यांनी संभ्रम सरल तरल सुनंदाला आठवताना स्वतःविषयी सृष्टीत…गोष्टीत सृष्टी-दृष्टी, वनात-जनात हमीद हवेसे

पुरस्कार

व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2017 सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार “सृष्टीत.. गोष्टीत” या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने “सर्वोत्कृष्ट पुस्तके” म्हणून जाहीर केली आहेत. अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे. सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला 12व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (2015) प्रदान करण्यात आला. अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेकडून साहित्य जीवन गौरव पुरस्कार

संबंधित बातम्या:

Maharashtra Cold Wave : उत्तर महाराष्ट्र गारठला, धुळ्यात 2.8 अंश तापमानाची नोंद, थंडीचा कडाका कायम राहणार

औरंगाबादेत गारठ्याचा उच्चांक, पारा आणखी एका अंशाने घसरला, वाचा आजचे Weather Updates

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना कोरोनाची लागण

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.