AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा महाराष्ट्रासाठी स्फुल्लिंग पेटवणारा क्षण! छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्को यादीत, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar first reaction : छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगडासह ११ किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी अशा १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हा महाराष्ट्रासाठी स्फुल्लिंग पेटवणारा क्षण! छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्को यादीत, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
शरद पवार
| Updated on: Jul 12, 2025 | 12:30 PM
Share

छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगडासह ११ किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी अशा १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने याविषयीची मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली. विभागाने याविषयीचा अहवाल युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राकडे पाठवला होता. त्यानंतर काल यापैकी काही किल्ल्यांवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

१२ किल्ल्यांचा समावेश

भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांसह तामिळनाडूतील जिंजी येथील किल्ल्याचे जागतिक वारसा यादीत समावेश करण्याची विनंती केली होती. एकूण १२ किल्ल्यांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती. युनेस्कोने ही मागणी केली आणि किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश केला.

ही घटना अभिमानाचं स्फुलिंग पेटवणारी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही आनंद वार्ता असल्याचे सांगत त्यावर एक्स या सोशल मीडियावर ट्विट केले आहे. “महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेची साक्ष देणारे राज्यातील ११ आणि तामिळनाडूतील ‘जिंजी’ किल्ला अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची बातमी प्रत्येक शिवप्रेमीच्या हृदयात अभिमानाचं स्फुल्लिंग पेटवणारी आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हा केवळ ऐतिहासिक सन्मान नाही, तर हे आपल्या स्वराज्याच्या साक्षीदार गडकिल्ल्यांचे जागतिक महत्त्व अधोरेखित करणारे गौरवचिन्ह आहे. आता छत्रपतींचा इतिहास केवळ आपल्या पाठ्यपुस्तकांपुरता न राहता, जागतिक अभ्यासाचा विषय होणार आहे, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

पण या गौरवाच्या पार्श्वभूमीवर एक जबाबदारीही आपल्या सर्वांवर येते ती म्हणजे गडकिल्ल्यांचं जतन, संवर्धन आणि सन्मानपूर्वक देखभाल. इतिहास जिवंत ठेवायचा असेल, तर केवळ स्मरणात नव्हे, तर कृतीतही तो उतरवायला हवा. कारण, संवर्धनाशिवाय वारसा केवळ आठवण बनून राहतो. या ऐतिहासिक यशाबद्दल भारत सरकार, पुरातत्व विभाग आणि इतिहास अभ्यासकांचे मनःपूर्वक आभार, अशी प्रतिक्रिया सुद्धा पवारांनी आपल्या पोस्टमध्ये दिली.

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.