मुंबई महापालिका मुख्यालयाची पर्यटकांना सफर घडणार, ऐतिहासिक वारसा उलगडणार

| Updated on: Jan 28, 2021 | 10:25 AM

मुंबई महापालिकेची भव्य इमारत आता पर्यटकांना पाहता येणार आहे. | Tourister will Visit to Mumbai Municipal Corporation

मुंबई महापालिका मुख्यालयाची पर्यटकांना सफर घडणार, ऐतिहासिक वारसा उलगडणार
मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेची भव्य इमारत आता पर्यटकांना पाहता येणार आहे. शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना ही इमारत आतून पाहता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (गुरुवार) संध्याकाळी 5 वाजता या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे गॉथीप शैलीतील 150 वर्षांच्या इतिहासाचा ऐतिसासिक वारसा उलगडणार आहे. (Tourister will Visit to Mumbai Municipal Corporation )

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा कारभार हाकणार्‍या महानगरपालिका मुख्यालयाच्या हेरिटेज इमारतीची पर्यटन सफर जानेवारीपासून सर्वसामान्यांना करता येणार आहे.

मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय’ इमारत दर्शन (Heritage Walk) कार्यक्रमाचा शुभारंभ आज (28 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे.

महानगरपालिकेच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करणात आला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती सुनील तटकरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील सर्वांत मोठी आणि श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. केंद्राला सर्वांत जास्त कर देणारं शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी देखील मानली जाते.

(Tourister will Visit to Mumbai Municipal Corporation)

हे ही वाचा :

चंद्रकांतदादांनी शब्द न पाळल्याचा आरोप, कोल्हापुरातील भाजप नेता काँग्रेसप्रवेशाच्या तयारीत

निलंगेकर म्हणतात, लातुरात लोकशाहीचा खून! ठाकरे, फडणवीस, देशमुखांकडे अप्रत्यक्ष बोट, राजकीय ‘फिक्सिंग’चा गौप्यस्फोट !