
गुजरातमधील भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा पुन्हा शपथविधी होणार आहे. आज छगन भुजबळ यांचा बीडमध्ये महाएल्गार मोर्चा आणि सभा होत आहे. राज्य निवडणुक आयोगासोबत चर्चेच्या दोन फेऱ्यानंतर विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाची आज कदाचित पुढील भूमिका काय आहे याविषयीची माहिती समोर येऊ शकते. महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग रचनेविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. तर धाराशिवसह अमरावती जिल्ह्यात मतदार याद्यांमध्ये घोळाचा आरोप करण्यात येत आहे. दादरमधील फुल बाजार विविध फुलांनी भरुन गेला आहे. सणासुदीत सोने आणि चांदीने ग्राहकांना चांगलाच इंगा दाखवला आहे. चांदीत तर दोन लाखांच्या घरात पोहचली आहे. तर सोन्याची मोठी घोडदौड सुरू आहे. काही भागात पावसाची शक्यता आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.