
देशासह राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. गुलाबी थंडीसोबतच बोचऱ्या थंडीची चाहुल लागली आहे. जळगावसह इतर अनेक शहरात पारा 10 अंशांच्या खाली घसरला आहे. बिहार निवडणुकीनंतर कर्नाटक राज्यात सीएम पदावरून रस्सीखेच दिसत आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार काल दिल्लीत दाखल झाले. तर मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा काँग्रेसने निर्धार केला आहे. तर अहिल्यानगरमधील कोपरगाव येथे नरभक्षक बिबट्याला वनविभागाने ठार केले आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात बिबट्यांच्या मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांमुळे वातावरण तापले आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचे काम संथ गतीने सुरू
नरेंद्रचार्य महाराज यांची सरकारवर नाराजी
साधू महंत यांच्या जागेवर पक्के बांधकाम करू नये, यासाठी सरकारने निर्णय घेण्याची आवश्यकता
साधू ग्रामच्या जागे संदर्भात शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा
आमच्या मठाची जागा आहे त्या ठिकाणी बस डेपो उभारला, मात्र आमच्यासमोर आता जागेचा प्रश्न
साधूग्रामची जागा नाशिकमध्ये अतिशय कमी
मंत्री गिरीश महाजन आणि सरकारने यावर निर्णय घ्यावे
नरेंद्रचार्य महाराज यांची मागणी
भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण मुंबई जिल्ह्याचा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा आज पार पडणार आहे. हा सोहळा वरळी येथील बीएमसी म्युनिसिपल शाळेत आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, तसेच महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र मंगल प्रभात लोढा हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या शासकीय जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात तब्बल 26 आरोपींविरुद्ध पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून मनीषा वाळेकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी
अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाचा मोठा निर्णय
सोमवारी सकाळी मनीषा वाळेकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार
मोठ शक्ति प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार
मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अश्विनी जाधव यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता अश्विनी जाधव यांनी मोहोळ नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरला आहे. आता या नगर परिषदेत तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.
पुण्याच्या भोर तालुक्यातील करंजगाव येथे घराच्या बंद दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून सुमारे 17 लाख 49 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मारुती भैरू मळेकर यांनी भोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज (रविवार) वेस्टन आणि सेंट्रलला मेगाब्लॉक असल्याने याचा फटका हा सर्वसामान्य प्रवाशांना बसत असल्याचे दिसत आहे. या ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. दादर येथे प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे
भुसावळ तालुक्यातील मानपुर शिवारात साखर कारखान्याच्या नावाखाली एकनाथ खडसेंनी महार वतनाची जमीन लाटली असल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा आंदोलन करत आरोप करण्यात आला होता याला उत्तर देताना खडसे म्हणाले की, ‘महार वतनाची जमीन लाटली असेल तर सिद्ध करून दाखवा 50 एकर जागा देईल.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी एनडीएला इतका मोठा विजय दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, “एनडीएला इतका मोठा विजय दिल्याबद्दल मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो. आमचे सरकार स्थापन होणार आहे. जनतेचे खूप खूप आभार. आम्हाला अपेक्षा होत्या, पण निकाल अपेक्षेपेक्षा खूपच चांगले आले. पण सर्व श्रेय जनतेला जाते. त्यांच्या 20 वर्षांच्या कामाचे बक्षीस दिले आहे. मला मनापासून आशा आहे की माझे वडील हा विश्वास कायम ठेवतील आणि विकासाची प्रक्रिया सुरू ठेवतील.”
काँग्रेसने 12 राज्यांमधील एआयसीसी प्रभारी, पीसीसी, सीएलपी आणि सचिवांची आढावा बैठक बोलावली आहे. ही बैठक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता इंदिरा भवन येथे होणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत प्रशांत किशोर आज पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, शेवटच्या क्षणी ही बैठक रद्द करण्यात आली.
सुकमामधील तुमलपाड गावाजवळ सुरक्षा दलांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस असलेले तीन नक्षलवादी ठार झाले.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची घुसमट, जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचा वाटा कमी असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र दुरगुडे यांनी म्हटलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब पालिकेसाठी दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र येऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे एकत्र लढण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादीचा प्रस्ताव असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
शाहांची चाकरी करणाऱ्या विखेंची बोलण्याची पात्रता नाही असा खोचक टोला देशमुख यांनी मारला आहे, विखेंकडून सत्तेसाठी नैतिकता, तत्व आणि निष्ठा गहाण ठेवण्यात आल्याची टीका देशमुखांनी केली आहे.
आमदार चषकाच्या टी-शर्ट आणि लोगोचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी बिहार निकालावरून भाजपावर टीका केली. ‘बिहारमध्ये सभेला रिकाम्या खुर्च्या असलेलेल्याचं सरकार आलं आहे” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
ठाणे खंडणी विरोधी पथकाने उबाठा गटाचे पदाधिकारी मनोज मयेकर यांना 20 लाखांची खंडणी घेताना रंगेहाथ अटक केली आहे. या प्रकरणावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उबाठा गटावर सडकून टीका करत “उबाठ्यात खंडणीखोरच उरले” अशी कडवी प्रतिक्रिया दिली.
स्थानिक पातळीवर युतीबाबत निर्णय होत आहेत. त्यामुळे परवापर्यंत चित्र स्पष्ट होईल. जागा वाटपवरून होतच नाही. जागा वाटप हे जिल्ह्यांमध्येच होत. यामुळे जिल्ह्यांमध्ये पक्षांनी जिथे शक्य आहे तिथे युती केली आहे. कुठे दोन पक्षांची युती झाली आहे तर कुठे कोणत्याच पक्षाची युती झालेली नाहीये. जिल्ह्यांस्तरावरील या छोट्या निवडणुका आहेत. मोठ्या निवडणुका नाहीत. ही काय राज्याची निवडणूक नाहीये, यामुळे तिथल्या तिथल्या परिस्थितीनुसार निर्णय होत असतात असे मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बांद्राच्या किल्ल्यावर दारूच्या पार्ट्या होणं, हे किल्ल्याचे पवित्र भाग करणे आहे. असे खुले आम होत असेल याचा अर्थ असा होतो, राज्य सरकार याला परवानगी देते असा याचा अर्थ होतो. विशालगडावर एवढे बोलले पण त्या ठिकाणची परिस्थिती जशीच्या तशी आहे असे अंबादास दानवे म्हणाले.
जळगाव शहरातील अक्सा नगर येथे राहणाऱ्या हमीदाबी जावेद कुरेशी या 30 वर्षीय विवाहितेची तिच्या पतीसह तिच्या सासरच्या मंडळींनी हत्या केली. राहत्या घरात तिला गळफास देऊन तिचा खून केल्याचा आरोप विवाहितेचे आई-वडिल आणि भाऊ यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएलच्या बसला आग लागली आहे. विजेच्या तारांचा शॉर्टसर्किट होऊन त्या तारांमधून निघालेल्या ठिणगीमुळे बसला आग लागली. पिंपरीतून भोसरीला जाणाऱ्या रूटवर या पीएमपीएल बसला आग लागली. या पीएमपीएल बसमध्ये 15 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने आग लागताच चालकाने प्रसंगावधन दाखवत सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवलं.
ऐतिहासिक वास्तूवर दारूपार्टीला परवानगी मिळतेच कशी, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. संंबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. वांद्रे किल्ल्यावर दारुपार्टी होत असल्याचा व्हिडीओ अखिल चित्रे यांनी पोस्ट केला आहे.
मुंबईतील वांद्रे इथल्या किल्ल्यावर दारूपार्टी सुरू असल्याचा व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केला आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे, असा सवाल करत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
मीरा भाईंदरमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं अत्याधुनिक कलादालन उभारण्यात आलंय. मिरा भाईंदरवासीयांसाठी हे कलादान उद्यापासून खुलं होणार आहे. उद्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
कल्याण पूर्वेचे आमदार सुलभा गायकवाड यांच्या नेतृत्वात रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, मनसे पक्षातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाला.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याचं कळतंय. नेव्हल डॉक परिसरात दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचं नाव जहांगीर शेख असल्याचंही सांगितलं आहे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
लैंगिक अत्याचारासह 50 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित भोंदू बाबा विरुद्ध गुन्हा दाखल… ॲट्रॉसिटीसह विविध कलमाद्वारे करण्यात आला गुन्हा दाखल… तू मला आवडते तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो असे सांगत महिलेवर दबाव आणल्याचा तक्रारीत उल्लेख… पुस्तकात पती सह मुलांची नावे लिहिली आहेत जर माझ्यासोबत संबंध ठेवला नाही तर पुस्तकातील नावांपैकी एकाचा बळी जाईल अशी जादूटोण्याची भीती दाखवत 2010 पासून आतापर्यंत अनेक वेळा केला लैंगिक अत्याचार… याप्रकरणी नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव येथील गणेश जगताप या भोंदू बाबावर करण्यात आला गुन्हा दाखल…
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी काल राजीनामा दिला यानंतर आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षात स्थानिक पातळीवर कुठल्याच निर्णय प्रक्रियेत आपल्याला घेतलं जात नसल्याची नाराजी व्यक्त केली. यानंतर ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते भाजपमध्ये आजच पक्षप्रवेश करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
जळगाव शहरातील गाजलेल्या आकाश उर्फ टपऱ्या युवराज कोळी खूनप्रकरणात अटकेत असलेल्या तिन्ही मुख्य आरोपींची शनिपेठ पोलिसांनी धिंड काढली. परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली दहशत कमी करण्यासाठी पोलीस व आरसीपी पथकाने ही कारवाई केली. 9 नोव्हेंबर रोजी किरकोळ वादातून टपऱ्या कोळीचा खून झाला होता. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तिन्ही आरोपींना अटक केली. शनिवारी त्यांच्या राहत्या परिसरातून तसेच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धिंड काढण्यात आली.
तळेगांव दाभाडे, वडगाव नगरपंचायती मध्ये शिवसेना शिंदे पक्षाची भाजप सोबत युती… लोणावळा नगरपरिषद शिवसेना, आरपीआय एकत्र लढवत आहोत…. लोणावळ्यात शिवसेना स्व:बळावर लढत आहे… वडगाव मावळ नगरपंचायतमध्ये भाजपसोबत काही जागांवर एकत्र लढत आहोत… तळेगाव नगरपरिषद येथे भाजप ला पाठिंबा दिला आहे… ज्या ठिकाणी शक्य आहे,तिथं भाजप ला पाठिंबा देत आहोत…भाजपने आधीच नगराध्यक्ष पदाची घोषणा केली होती… म्हणून महायुतीमधील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी काल राजीनामा दिला यानंतर आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षात स्थानिक पातळीवर कुठल्याच निर्णय प्रक्रियेत आपल्याला घेतलं जात नसल्याची नाराजी व्यक्त केली. यानंतर ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते भाजपमध्ये आजच पक्षप्रवेश करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजलगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषद घेत खलील पटेल यांचे नाव घोषित केले असून ते आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असतील त्यांच्या नावाची घोषणा स्वतः आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे.
लैंगिक अत्याचारासह 50 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित भोंदू बाबा विरुद्ध गुन्हा दाखल. ॲट्रॉसिटीसह विविध कलमाद्वारे करण्यात आला गुन्हा दाखल. तू मला आवडते तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो असे सांगत महिलेवर दबाव आणल्याचा तक्रारीत उल्लेख
जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार अपघाताचा सीसीटीव्ही समोर. श्रीरामपूर – बेलापूर रस्त्यावर हा भीषण अपघात झाला असून अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.. भरधाव कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली आणि उलटली.. अपघातानंतर स्थानिकांनी मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तांभेरे येथील जाधव वस्तीजवळ बिबट्याचा मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद. एका शेतकऱ्याने मोबाईलमध्ये चित्रित केला बिबट्याचा मुक्त संचार.वाड्यावस्त्यांवर जाणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास करणं बनलय जीवघेणं. शालेय विद्यार्थी देखील धास्तावले…
नाशिकमधील मोक्का लावलेल्या लोंढे टोळीतील पिता -पुत्रांवर पुन्हा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेत जमिनीवर कब्जा करून , तीन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरपीआय नेते माजी नगरसेवक प्रकाश लोंढे , दीपक लोंढे यांच्यासह बारा जणांनी पिस्तूल रोखून जमीन हडपल्याची तक्रार देण्यात आली होती. पाच हेक्टर जमीन हडपून जमिनीवरील कब्जा सोडवण्याच्या मोबदल्यात तीन कोटी रुपये मागितले होते.
कार्यकर्त्यांचा असो किंवा सर्वसामान्यांचा असो पहिल्या बेल मध्ये मी फोन नाही उचलला तर मी गुलाबराव पाटील नाही. समस्या सोडवण्यासाठी आमचंही दुकान 24 तास चालू असतं.मी एकनाथ शिंदे यांचा चेला आहे असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये एका कार्यक्रमात केले. युती होईल किंवा नाही होईल याची पर्वा करू नका? असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. रावण अजूनही जिवंत आहे रावण हा जिवंत राहिला पाहिजे नाहीतर रामायण संपून जाईल.कलियुगातले रावण अजूनही जिवंत आहेत.त्याचा नाश करण्यासाठी आपल्याला विकास करायचा आहे, असे पाटील म्हणाले.
चंद्रपूरमधील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी भाजपमध्ये नगराध्यक्ष पदावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. अलीकडेच भाजपमध्ये आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी गटनेते विलास विखार यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यासाठी एक गट आग्रही तर दुसऱ्या गटाचा विखार यांच्या नावाला तीव्र विरोध आहे.विलास विखार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ब्रह्मपुरी मतदार संघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अतिशय जवळचे कार्यकर्ते मानले जातात. मात्र त्यांना भाजपात आणून आमदार बंटी भांगडिया यांनी मोठा धक्का दिल्ला होता. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या आणि विजय वडेट्टीवार यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ब्रह्मपुरी नगरपरिषदेत भाजपचा झेंडा रोवण्यासाठी आमदार भांगडीया विखार यांच्या नावासाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे ब्रह्मपुरीचे माजी आमदार अतुल देशकर यांचा विखार यांच्या नावाला विरोध आहे. देशकर यांचा जुन्या कार्यकर्त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याचा आग्रह केला आहे.
बीडच्या माजलगाव नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत होईल विद्यमान आमदार (प्रकाश सोळंके) शर्यतीच्या बाहेर आहेत. भाजपा विरूद्ध राष्ट्रवादी आणि बहुजन विकास मोर्चा अशी लढत होईल अशी प्रतिक्रिया बहुजन विकास मोर्चाचे नेते बाबुराव पोटभरे यांनी दिली आहे. तर बहुजन विकास मोर्चाच्या माध्यमातून बाबुराव पोटभरे हे देखील नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय.
आमच्या येथे पण पैठण मध्ये असेच झाले, आणि त्यांना सांगितले टीव्ही वर बघा बिहार मध्ये एकच जागा आली,माझी विनंती आहे की, सध्या डाऊन फॉल सुरू असला तरी, आपण निवडून येण्यासाठी तडजोड सोडून द्या नाही तर भाजपा पुन्हा डोक्यावर बसेल.काँग्रेसने अजूनही युतीचा निर्णय घेतला पाहिजे आणि आघाडी धर्म पाळला पाहिजे.काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढला तर कसा मजबूत होणार, बिहार मध्ये किती जागा लढल्या पण एकच जागा आली.राहुल गांधी यांनी जे मतचोरीचे दाखवले त्याचा काहीच परिणाम बिहार मध्ये झाला नाही.आपण दिलासा देण्यासाठी म्हणू शकतो वोटिंग मशीन खराब झाली असेल,असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
कोपरगाव तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश आले आहे. काल रात्री धारणगाव शिवारात वन विभागाने कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरु होता. एकाच आठवड्यात त्याने दोन बळी घेतले होते. नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका आणि 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.