
नगर लोकसभेत भाजपचे सुजय विखे विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंकेंमध्ये लढत होणार आहे. नगरमध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर, श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेडचा समावेश आहे. 2019 ला भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप लढले. विखेंना 7,04,660 तर जगतापांना 4,23,186 मतदान झालं. विखे 2,81,474 मतांच्या फरकानं जिंकले होते. गेल्यावेळी सहाच्या सहा विधानसभांमध्ये सुजय विखेंना लीड मिळालं होतं.
बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे विरुद्द सुनेत्रा पवार यांच्यातल्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झालीय. बारामतीत इंदापूर, पुरंदर, दौंड, भोर, बारामती आणि खडकवासला या ६ विधानसभा आहेत. 2019 सुप्रिया सुळेंविरुद्ध भाजपच्या कांचन कूल लढल्या सुळेंना 6 लाख 86 हजार 714, कांचन कूल यांना 5,30,940 मतं पडली. सुळेंचा 1 लाख 55 हजारांहून अधिकच्या मतांनी विजय झाला होता. भोर, पुरंदर, इंदापूर आणि बारामतीत सुप्रिया सुळेंना तर खडकवासला आणि दौंडमध्ये कांचन कूल यांना लीड होतं
दिंडोरी लोकसभेत भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भास्करराव भगरेंमध्ये लढत होणाराय. दिंडोरीत नांदगाव, येवला, चांदवड, कळवण, निफाड आणि दिंडोरी हे मतदारसंघ येतात. 2019 ला भारती पवारांविरुद्ध राष्ट्रवादीचे धनराज महाले लढले. पवारांना 5,67,470 तर महालेंना 3,68,691 मतं पडली होती. 1,98,779 मतांनी भारती पवारांचा विजय झाला होता. 5 मतदारसंघांमध्ये भारती पवारांना लीड होतं. तर महालेंना दिंडोरीत आघाडी मिळाली होती.
शिरुरसाठी शरद पवारांच्या गटाकडून अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजी आढळरावांमध्ये पुन्हा सामना होणाराय. शिरुर लोकसभेत जुन्नर, आंबेगाव, खेड-आनंदी, शिरुर, भोसरी आणि हडपसर हे विधानसभा संघ येतात. 2019 ला कोल्हेंना 6,35,830 तर आढळरावांना 5,77,347 मतं पडली होती. कोल्हेंनी 58,483 मतांनी आढळरावांचा पराभव केला होता. कोल्हे जुन्नर, आंबेगाव, खेड-आनंदी आणि शिरुरमधून आघाडीवर होते. तर शिवसेनेच्या आढळरावांना भोसरी आणि हडपसर या दोन ठिकाणी लीड होतं
वर्धा लोकसभेत भाजपच्या रामदास तडस यांच्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अमर काळेंना उमेदवारी दिलीय. वर्धा लोकसभेत धामणगाव, मोर्शी, आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा या विधानसभा येतात. 2019 ला रामदास तडस यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या चारुलता टोकस लढल्या होत्या. तडस यांना 5,78,364 तर टोकस यांना 3,91,173 मतं मिळाली. भाजपचा इथं 1,87,191 मतांनी विजय झाला होता. सर्वच्या सर्व सहा मतदारसंघात भाजपचे तडस यांना लीड होतं.