AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | घातपाताची शंका घेणाऱ्यांना संयमाची लस टोचण्याची गरज: उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या खासदारांनी मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांची भेट घ्यावी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. Uddhav Thackeray Serum Fire

Uddhav Thackeray | घातपाताची शंका घेणाऱ्यांना संयमाची लस टोचण्याची गरज: उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Jan 21, 2021 | 6:04 PM
Share

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सीरम इनस्टिट्यूटला लागलेली आग, खासदारांची बैठक,राज्यासमोरील प्रश्न, मेट्रो कारशेड आदी मुद्यांवर भाष्य केले. सीरमला लागलेली आग बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी लागल्याची माहिती आहे.  अग्निशमन दलाच्या जवानांनी चांगलं काम केले. ते स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम करतात. सीरमच्या आगीवर आग पूर्ण विझल्यानंतर बोलूया, अस मुख्यमंत्री म्हणाले. अदर पुनावालांशी नंतर बोलणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईक आणि इतर गोष्टींची माहिती त्यांच्याकडे कशी येते, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. सीरमच्या आगीवर घातापाताचा संशय व्यक्त करणाऱ्यांना संयमाची लस टोचण्याची गरज असल्याचा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. (Uddhav Thackeray slams opposition leaders who gave early statements on Serum fire )

मराठा आरक्षण,कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा प्रश्न मोदींसमोर मांडा

संसदेच्या अर्थसंकल्पापूर्वी राज्यातील खासदारांची बैठक घेतली. जलंसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्याच्या खासदारांसह बैठक झाली. खासदारांनी त्यांच्या समस्या मांडल्या. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदारांनी पंतप्रधानांना भेटलं पाहिजे. मराठा आरक्षणावर केंद्र सरकारला भूमिका घ्यावी लागणार आहे. कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र राज्यात आणण्यासाठी पंतप्रधानांची भेट घ्यावी, असं खासदारांना सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

खासदारांनी जे प्रश्न मांडले आणि त्या प्रश्नांसंबंधी विभागवार समित्या बनवणार आहे. अधिवेशन झाल्यानंतर खासदारांची बैठक घेणार आहे. खासदारांच्या सूचनांनवर काय प्रगती झाली, याचा आढावा घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज्याच्या प्रश्नी पक्षभेद विसरून एकत्र या

जीएसटीच्या परताव्याबद्दल महाराष्ट्राच्या खासदारांनी पक्षभेद विसरुन एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन केलं आहे, असं आवाहन केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. खासदारांसमोर मेट्रो कारशेडचं पुन्हा एकदा प्रेझेंटेशन करण्याची तयारी आहे. जनतेच्या प्रकल्पांवरून केंद्र आणि राज्यानं तू-तू-मै-मै करण्याची गरज नाही. केंद्र राज्यानं एकत्र येऊन जनतेच्या विकासासाठी काम करणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना टोला लगावला.

संबंधित बातम्या:

Serum Institute Fire Live | कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग

Rajesh Tope on Serum fire LIVE | सीरमच्या आगीत 5 जणांचा मृत्यू : आरोग्य मंत्री राजेश टोपे

(Uddhav Thackeray slams opposition leaders who gave early statements on Serum fire)

बईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
बईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....