AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांच्यासाठी नियम बदलले काय?; उद्धव ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला सवाल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला एक खरमरीत पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी निवडणूक आयोगाने आचारसंहितेत काही बदल केला आहे का? असा सवाल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारांना रामलल्लाचं दर्शन मोफत घडवून आणण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे निवडणुकीत असे मुद्दे घेतले तर चालतील का? असा सवाल ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.

अमित शाह यांच्यासाठी नियम बदलले काय?; उद्धव ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला सवाल
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2023 | 2:59 PM
Share

मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशच्या निवडणुकीत मतदारांना अयोध्येतील रामल्लाचं मोफत दर्शन देण्याचं आश्वासन दिलं आहे. शाह यांच्या या आश्वासनाला माजी मुख्यमंत्री उद्द व ठाकरे यांनी हरकत घेतली आहे. निवडणुकीत धार्मिक गोष्टींचं आश्वासन देता येतं काय? निवडणूक आयोगाने आचारसंहितेत बदल केला आहे काय? की भाजपला नियमातून डावललं गेलं आहे. नियम फक्त आम्हालाच आहे काय? असा सवाल करणारे खरमरीत पत्र उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी याबाबतची माहितीही दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकाच्या निवडणुकीत बजरंग बली की जयचा नारा दिला होता. त्यावेळी त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. आता मध्यप्रदेशाच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोफत रामलल्लाचं दर्शन घडवून देण्याचं आश्वासन मतदारांना दिलं आहे. निवडणुकीत धर्मावर आधारीत विधानं करून मतदान मागता येत नाहीत.

हा नियम आता निवडणूक आयोगाने शिथील केला आहे काय? धार्मिक आधारावर मतं मागितली म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या सहा शिलेदारांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता. ते चुकीचं होतं की बरोबर? मोदी आणि शाह आता जे करत आहेत ते योग्य आहे काय? आचारसंहितेत बसतं का? निवडणूक आयोगाने नियम शिथील केले का? केले असतील तर कधी केले?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

सरकारी भाषेत अवगत करा

निवडणूक आयोगाने आचार संहितेत बदल केला असेल तर तो सर्वच राजकीय पक्षांना सांगितला पाहिजे. केवळ हा बदल केल्याचं भाजपलाच सांगितलं का?, असा सवाल करतानाच राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. यावरून निवडणूक आयोग जागरूक आहे हे दिसून येतं. मोदी आणि शाह यांनी निवडणुकीत जे केलं ते चुकीचं आहे असं वाटत नाही. मग आम्ही जे केलं होतं ते अयोग्य होतं का? हे आम्हाला निवडणूक आयोगाने सांगावं. आम्हाला आपल्या सरकारी भाषेत अवगत केलं तरी चालेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. याबाबतचं पत्र निवडणूक आयोगाला पाठवल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना