उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, कोकणातील बडा नेता थेट शिंदेंच्या बैठकीत, ऑपरेशन टायगर?

उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांदरम्यान, कोकणातील प्रमुख नेते आणि नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला हजेरी लावली. यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली असून, आणखी एक नेता शिंदे गटात सामील होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, कोकणातील बडा नेता थेट शिंदेंच्या बैठकीत, ऑपरेशन टायगर?
eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2026 | 10:08 AM

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहेत. शिंदे गटाच्या नेत्यांकडून ऑपरेशन टायगरचे थेटच संकेत दिले आहेत. त्यामुळे ठाकरे गट फुटण्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पण ठाकरेंचे आमदार फुटणार, नगरसेवक फुटणार की खासदार फुटणार? हे मात्र गुलदस्त्यात आहेत. पण शिंदे गटाकडून वारंवार ऑपरेशन टायगरचा पुनरुच्चार करण्यात येत असल्याने ठाकरे गटात खळबळ उडालेली आहे. एकीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाच्या कोकणातील बड्या नेत्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी लावल्याने चर्चांना उधाण आलं आहे. हा नेता तर शिंदे गटात जाणार नाही ना? अशी चर्चा या निमित्ताने रंगणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये नगराध्यक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्षांना मार्गदर्शन केले. महायुतीत संवाद ठेवण्यास सांगितला. तसेच विकास कामांवर जोर देण्यास सांगितले. मात्र, या बैठकीत ठाकरे गटाचे कोकणातील बडे नेते आणि सिंधुदुर्गचे नगराध्यक्ष संदेश पारकरही आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Loading...

गुपचूप काढता पाय

राज्यातील शिवसेनेच्या 63 नगराध्यक्षांची काल एकनाथ शिंदेंनी विशेष बैठक बोलावली होती. यावेळी नगराध्यक्षांना येणाऱ्या अडचणी समजून घेत शिंदेंनी त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी सिंधुदुर्गचे उबाठाचे नगराध्यक्ष संदेश पारकरही उपस्थित होते. कार्यक्रम संपताच कुणाच्या निदर्शनास न येता पारकर यांनी चव्हाण सेंटरमधून काढता पाय घेतला. पारकर यांच्या शिंदेंच्या सभेतील उपस्थितीमुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. पारकर यांची उपस्थिती ही ऑपरेशन टायगरचे संकेत तर नाहीत ना? अशी चर्चा आता या निमित्ताने रंगली आहे.

ऑपरेशन टायगर होणारच

दरम्यान, शिंदे गटाचे नेते उदय सामंत, संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांनी ऑपरेशन टायगरचे संकेत दिले आहेत. ऑपरेशन टायगर होणार आहे. पण कधी होईल हे सांगितलं जाणार नाही. मागच्यावेळी खासदार आमच्यासोबत आले. त्यावेळीही आम्ही ऑपरेशन टायगर होणार असल्याचं सांगितलं होतं. पण आम्ही वेळ आणि तारीख सांगितली नव्हती. मात्र, आमचं ऑपरेशन टायगर यशस्वी झालं. यावेळीही तेच होणार आहे, असं शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या टप्प्यात शिंदे गटाच्या गळाला कोण लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us