हिंदू हा शब्द उच्चारूही नये आणि जिभेवरही आणून नये, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंचा पाढा राणेंनी वाचला…

महादेव कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Nov 29, 2022 | 6:13 PM

माजी मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्त्वाचा मुद्या सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर गेले, त्यामुळे त्यांनी हिंदुत्व हा शब्दही उच्चारू नये अशी टीका राणे यांनी केली आहे.

हिंदू हा शब्द उच्चारूही नये आणि जिभेवरही आणून नये, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंचा पाढा राणेंनी वाचला...

मुंबईः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व आणि सावरकर हे शब्दही उच्चारू नये आणि ते शब्द जिभेवरही आणू नये अशी जोरदार टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेससह राष्ट्रवादीवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडून काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन केली. त्यामुळे त्यांनी हिंदुत्व आणि सावरकर हे शब्द त्यांनी आता उच्चारूही नये अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन करून त्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे असंही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

त्यांची गद्दारी दिसून येत असल्यामुळेच त्यांनी आता जरी माफी मागितली तरी ती चूक भरून काही येणार नाही असा टोलाही त्यांना त्यांनी लगावला आहे.शिं

दे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर ठाकरे गटासह माध्यमांनी राज्यातील उद्योग धंदे शेजारीला राज्यात गेल्याची टीका शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

मात्र हे उद्योग राज्यात येण्याआधीच त्याबाबतची चर्चा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर झाली होती. त्याबाबत का चर्चा केली जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राज्यात उद्योगधंदे येण्यापूर्वी एक प्रक्रिया राबवली जाते, मात्र ही प्रक्रियाच उद्धव ठाकरे यांना माहिती नसल्याचा टोला त्यांना लगावण्यात आला.

राज्यात येणाऱ्या कर उद्योगांना कर सवलत किती द्यायची, ते कसे आणायचे याची कोणतीही माहिती उद्धव ठाकरे यांना माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांना मुख्यमंत्री पदाबाबत काहीच माहिती नव्हते अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली.

त्यांना कोणत्याच प्रथा, परंपरा माहिती नाहीत, फक्त तुम्ही या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसा असं सांगण्यात आल्यानंतर त्यांनी फक्त बसण्याचं काम केलं आहे असं मतही त्यांनी व्यक्त केले आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI