Vidhan Parishad Election : क्या नाराजी नाराजी बोल रहें हो बार बार, विधान परिषदेबाबत विचारल्यावर अजित पवारांचं तिखट उत्तर

यावेळी अजित पवारांना महाविकास आघाडीतील नाराजीबाबत विचारले असतात, क्या नाराजी क्या नारजी बोल रहे हो बार बार, आमच्यात कुणीही नाराज नाही, अशी प्रतिक्रिया देताना ते दिसून आले. तसेच मित्रपक्षांची मतं मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय असेही त्यांनी स्पष्ट केलं.

Vidhan Parishad Election : क्या नाराजी नाराजी बोल रहें हो बार बार, विधान परिषदेबाबत विचारल्यावर अजित पवारांचं तिखट उत्तर
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 3:43 PM

मुंबई : राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांचा (Vidhan Parishad Election) धुरळा उडाला आहे. यातच आता आमदारांना सर्वच राजकीय पक्षांकडून फोनाफोनी सुरू आहे. शिवसेनेने (Shivsena) आपले आमदार आधीच हॉटेलवर ठेवले आहेत. त्यात काही अपक्ष आमदारही आहेत. आज अजित पवारांना (Ajit Pawar) विधान परिषदेबाबात पत्रकारांनी काही प्रश्न विचारले, यावेळी अजित पवार काही तिखट उत्तरं देताना दिसून आले. तसेच अपक्ष आमदारांना सर्वच राजकीय पक्षांनी फोन केल्याचेही त्यांनी मान्य केले. मात्र याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. यावेळी अजित पवारांना महाविकास आघाडीतील नाराजीबाबत विचारले असतात, क्या नाराजी क्या नारजी बोल रहे हो बार बार, आमच्यात कुणीही नाराज नाही, अशी प्रतिक्रिया देताना ते दिसून आले. तसेच मित्रपक्षांची मतं मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय असेही त्यांनी स्पष्ट केलं.

आमची सर्वांची एकजूट आहे

या विधान परिषदेच्या निवडणुकीत मतं बाद होणार नाहीत याच्यासाठी काळजी घेतोय. राज्यसभेत काय घडलंय सर्वांनी पाहिलं आहे. मात्र यावेळी शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीची एकजूट आहे. आम्ही एकमेकांना भेटतो आहे. अपक्षांना काही नेत्यांनी फोन केले हे खरं आहे. मुख्यमंत्री सांगितील तसं आम्ही मतदान करू असे आमदारांनी सांगितलं आहे. असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे. तसेच ज्याला मतं कमी पडतील तो बाहेर होईल, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

पवार बैठकीला मार्गदर्शन करणार

तर आज संध्याकाळी आमच्या आमदारांची बैठक आहे. या बैठकीला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. मला अजून कोणत्याही सूचना आल्या नाही. कुणीही दबाव आणल्याचे अजून सांगितलं नाही. यावेळी आमदार निवडून देत असताना आपल्याकडे व्यवस्थित कोटा आहे. मागच्या वेळी आमचे उमेदवार निवडून देऊन कमी मतं उरत होती. त्यामुळे आम्ही एकत्र बैठक घेतली होती. मात्र आता शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येतील असं चित्र आहे. आम्हाला थोडी संख्या कमी पडतेय त्याबाबत आम्ही अपक्षांची मदत घेऊ, असेही अजित पवार म्हणाले.

अग्निपथ योजनेबाबत काय म्हणले?

तसेच अजित पवार यांनी अग्निपथ योजना आणि त्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावरही भाष्य केलं आहे. अग्निपथ योजनेविरोधात तरुणांचा रोष पहायाला मिळाला. तरुणांच्या आंदोलनात सार्वजनिक संपत्तीचं नुकासान झालं. केंद्राने आधीच वयाची मर्यादा वाढवली असती तर हे झालं नसतं. तरुणाईवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ, पण राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणे योग्य नाही, असेही अजित पवारांनी यावेळी बजावलं आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.