AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! विनायक मेटे यांचा हुकमी एक्का, शिवसंग्रामचा तरुण चेहरा शिंदे गटात

शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांचा अत्यंत जवळचा सहकारी, पक्षाचा तरुण चेहरा अशी ओळख असलेला नेता आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आलीय.

मोठी बातमी! विनायक मेटे यांचा हुकमी एक्का, शिवसंग्रामचा तरुण चेहरा शिंदे गटात
| Edited By: | Updated on: Nov 19, 2022 | 5:56 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांचा अत्यंत जवळचा सहकारी, पक्षाचा तरुण चेहरा अशी ओळख असलेले शिवसंग्राम युवकचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर यांनी खूप मोठा निर्णय घेतलाय. उदय आहेर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसंग्राम पक्षासोबत काम करत आहेत. पण शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्यासोबत उडालेल्या खटक्क्यांमुळे त्यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. या वृत्तामुळे विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम पक्षात फुट पडली की काय? अशा चर्चांना आता उधाण आलंय.

शिवसंग्राम पक्षातील जवळपास 90 टक्के पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्यासोबत शिंदे गटाला पाठिंबा दर्शवणार असल्याची माहिती खुद्द उदय आहेर यांनी दिलीय. उदय आहेर यांनी आपल्या भूमिकेबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.

“विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राममध्ये नेतृत्वाची खूप मोठी पोकळी निर्माण झालीय. फक्त शिवसंग्रामच नाही तर इतरही मराठा समाज आणि बारा बलुतेदार समाजासाठी विनायक मेटे यांचा आधार होता. त्यांच्या निधनानंतर खूप मोठी पोकळी निर्माण झालीय”, असं उदय आहेर म्हणाले.

“मराठा समाज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न, शेतकरी पेन्शन योजना आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंच आणि इतरही प्रश्न आहेत, त्यांचं निरसन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आश्वासक चेहरा आहे. एकनाथ शिंदे हे प्रश्न सोडवू शकतात. त्यामुळे शिवसंग्रामच्या जवळपास 90 टक्के पदाधिकाऱ्यांनी, आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलाय की आता शिवसंग्रामचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना द्यायचा”, अशी भूमिका उदय आहेर यांनी मांडली.

शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी कुणीही पदाधिकारी शिंदे गटात गेले नाहीत, असं विधान केलंय. त्यांच्या या प्रतिक्रियेबाबत उदय आहेर यांना प्रश्न विचारला असता, “एकटं उरल्यानंतर अशी आदळाआपट होणारच आहे. किती पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेत हे आता लवकरच कळेल. सगळ्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झालीय”, असा गौप्यस्फोट उदय आहेर यांनी केला.

“मुंबईत खूप मोठा मेळावा घेऊन आम्ही आमचं शिंदे गटाला समर्थन जाहीर करणार आहोत. त्यामुळे तानाजी शिंदे काय बोलतात या गोष्टीला आम्ही फार महत्त्व देत नाहीत”, अशी प्रतिक्रिया उदय आहेर यांनी दिली.

दरम्यान, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी नुकतंच उदय आहेर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे संतापलेल्या उदय आहेर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.