AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Water Cut: बोरिवली ते दहिसरमधील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार; महापालिका म्हणते, पाणी जपून वापरा!

Water Cut: पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा.

Water Cut: बोरिवली ते दहिसरमधील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार; महापालिका म्हणते, पाणी जपून वापरा!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 06, 2022 | 5:27 PM
Share

मुंबई: बोरिवली (पूर्व) (Borivali) परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोर पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूर्वेकडील ‘सर्व्हिस रोड’वर 1050 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बंद करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. मंगळवार, दिनांक 10 मे रोजी सकाळी 11:30 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत हे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत म्हणजेच मंगळवार 10 मे रोजी सकाळी 11:30 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत ‘आर मध्य’ व ‘आर उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा वेळेत कपात (Water Cut) करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘आर उत्तर’ विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. म्हणजे बोरिवली ते दहिसर परिसरात काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही ठिकाणी पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने (bmc) केले आहे.

कोणत्या भागात पाणीबाणी

  1. ‘आर मध्य’ विभागः अ) संत ज्ञानेश्वर मार्ग (शांतिवन), श्रीकृष्ण नगर, अभिनव नगर, सावरपाडा, काजुपाडा (सखल पातळी परिसर), ईश्वर नगर, सुदाम नगर, चोगले नगर – (सकाळी 8.30 ते 10.45 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान सकाळी 8.30 ते 10 पाणीपुरवठ्याची वेळ राहील).
  2. ‘आर उत्तर’ विभागः ब) ओवरीपाडा (अंशत:), राजेश कुंपण, शांती नगर, अशोकवन (सखल पातळी परिसर), शिव वल्लभ मार्ग (दक्षिण बाजू), संत ज्ञानेश्वर मार्ग, न्यांसी डेपो, चोगले नगर, सावरपाडा, संभाजी नगर, शिव टेकडी, संतोष नगर, गणेश नगर, शुक्ला कुंपण, पांडे नगर – (सकाळी 8.30 ते 10.45 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान सकाळी 8.30 ते 10 पाणीपुरवठ्याची वेळ राहील).
  3. ‘आर मध्य’ विभागः अ) काजुपाडा (उंच पातळी परिसर), माने कंपाऊंड, पाटील कंपाऊंड, जगरदेव कंपाऊंड, ओम सिद्धराज संकुल, गिरीशिखर संकुल, मोठी मजीद परिसर – (सकाळी 10.45 ते दुपारी 12.30 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान सकाळी 10 ते 11.30 पाणीपुरवठ्याची वेळ राहील).
  4. ‘आर उत्तर’ विभागः ब) अशोक वन (उंच पातळी परिसर), देशमुख रेसिडेन्सी, साईश्रद्धा फेज 1 व 2 – (सकाळी 10.45 ते दुपारी 12.30 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान सकाळी 10 ते 11.30 पाणीपुरवठ्याची वेळ राहील).
  5. ‘आर उत्तर’ विभागः शिव वल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुती नगर, रावळपाडा, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, कोकणीपाडा, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, वैशाली नगर, केतकीपाडा (अंशत:), एकता नगर, दहिसर टेलीफोन एक्स्चेंज, घरटनपाडा क्रमांक 1 व 2, संत मिराबाई मार्ग, वाघदेवी नगर, शिवाजी चौक, केशव नगर – (सायंकाळी 5.30 ते 7.40 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहील).
  6. ‘आर उत्तर’ विभागः आनंद नगर, आशिष संकुल, एन. एल. संकुल, वीर संभाजी नगर, छत्रपती शिवाजी संकुल, भाबलीपाडा, अवधूत नगर, वर्धमान औद्योगिक इस्टेट, सुधींद्र नगर, केतकीपाडा ऑन लाईन पंपिंग – (रात्री 9.30 ते 11.30 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, 10 मे रोजी कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहील).
  7. वरील तपशिलानुसार संबंधीत परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?