पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये डेंग्यूच्या अळ्या, कर्मचारी संतप्त

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ वर्कशॉपमध्ये अनेक ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळल्या (Lower Parel workshop mosquito larvae found) आहेत.

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये डेंग्यूच्या अळ्या, कर्मचारी संतप्त


मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ वर्कशॉपमध्ये अनेक ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळल्या (Lower Parel workshop mosquito larvae found) आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे. या अळ्यांची तपासणी करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेने लोअर परळ वर्कशॉपमध्ये सुरुवातीला 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वर्कशॉप सुरु करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर 30 टक्के कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ वर्कशॉपमध्ये अनेक कर्मचारी काम करत आहे. यात रेल्वेच्या डब्ब्यांची डागडुजीच्या दरम्यान काही भागात पावसाचे पाणी साचले आहेत. यात डेंग्यू डासांच्या अळ्या आढळल्याने कर्मचारी वर्ग संतप्त झाला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

रेल्वे इंजिनचे काम करत असलेल्या ठिकाणीच अळ्या आढळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात आता मलेरिया, डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

तसेच या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचेही समोर येत आहे.

हेही वाचा – केवळ RSS आणि अन्य संस्थांमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण, नितेश राणेंचा दावा

दरम्यान यानंतर लोअर परेल रेल्वे वर्कशॉपमधील कामगारांच्या तक्रारीची दखल घेत महापालिका अधिकाऱ्यांसोबत भेट दिली. त्या ठिकाणी स्वच्छतेचे आणि इतर रोगराई पसरणार नाही याची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले, असे लोअर परळचे शिवसेना विभागप्रमुख आशिष चेंबूरकर म्हणाले. (Lower Parel workshop mosquito larvae found)

संबंधित बातम्या : 

Leptospirosis | मुंबईत कोरोनानंतर आता लेप्टोचा धोका, नेमकी लक्षणं काय?

Flood Warning System | पावसाळ्यात मुंबईसाठी वरदान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकात्मिक पूर इशारा यंत्रणेचे ई-उद्घाटन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI