Leptospirosis | मुंबईत कोरोनानंतर आता लेप्टोचा धोका, नेमकी लक्षणं काय?

मुंबईत पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचतं. त्यामुळे लेप्टोचा विषाणू माणसाच्या शरीरात शिरण्याची शक्यता (Symptoms of Leptospirosis) आहे.

Leptospirosis | मुंबईत कोरोनानंतर आता लेप्टोचा धोका, नेमकी लक्षणं काय?

मुंबई : राज्यात कोरोनाचे थैमान सुरु असताना आता लेप्टोचाही धोका निर्माण झाला (Symptoms of Leptospirosis)   आहे. दरवर्षी मुंबईत पावसाळ्यात लेप्टोस्पारोसिसचाही धोका निर्माण होतो. मुंबईत पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचतं. त्यामुळे लेप्टोचा विषाणू माणसाच्या शरीरात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी 24 ते 72 तासात वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे.

ज्या नागरिकांचा पावसाच्या पाण्याशी संबंध आला होता. तसेच पायावर जखमा असलेल्या व्यक्ती पावसाच्या पाण्यात वावरल्यास त्यांना लेप्टोची बाधा होण्याचा जास्त धोका आहे. लेप्टोचा सूक्ष्मजंतू नाक आणि तोंडा वाटेही शरीरात जाऊ शकतो. या रुग्णांवर 24 ते 72 तासात वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे. मात्र वेळीस उपचार न झाल्यास जीवावरही बेतू शकते, असं पालिकेने जाहीर केलं आहे.

लेप्टो कशामुळे होतो?

लेप्टो हा सूक्ष्मजीव उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी तसेच इतर प्राण्याच्या शरीरात आढळतो. जनावरांच्या मुत्रातून सुक्ष्म जीव माती आणि पाण्यात मिसळतो. त्यातून तो मानवी शरीरात प्रवेश करतो. नाक आणि तोंडावाटे तसेच शरीरावर असलेल्या लहानश्या जखमेतून विषाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करु शकतो. तसेच मनुष्यापासून मनुष्याला लेप्टोच्या संसर्गाची बाधा होत नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले .

काय आहेत लेप्टोची लक्षणे?

  • तीव्र डोकेदुखी
  • थंडी वाजणे
  • स्नायुदुखी
  • उलटी
  • कावीळ
  • रक्तस्त्राव
  • श्वासोच्छश्वास करण्यास त्रास होणे
  • मूत्रपिंड आणि यकृत निकामी होणे

या रुग्णांना योग्यवेळी औषधोपचार न मिळाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका संभवतो. साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे ‘लेप्टोस्पायरोसिस’ संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘लेप्टोस्पायरोसिस’ प्रतिबंधात्मक उपचार तातडीने घेणे आवश्यक आहे. ताप आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला (Symptoms of Leptospirosis) घ्या.

संबंधित बातम्या : 

टाटा समुहाकडून प्लाझ्मा थेरपीसाठी रसद, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 कोटी, 100 व्हेंटिलेटर्स, 20 रुग्णवाहिका प्रदान

नवी मुंबई सिडको ‘स्वप्नपूर्ती’ची पहिल्याच पावसात ‘जलपूर्ती’, गुडघ्याभर पाण्यात सापांचा वावर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *