मनसेकडून सविनय कायदेभंग करत मुंबईकरांसाठी लोकल प्रवास, सविनय कायदेभंग म्हणजे काय?

| Updated on: Sep 21, 2020 | 11:54 AM

मनसेकडून सविनय कायदेभंग करत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी लोकलमधून प्रवास केला. (What Is Civil Disobedience Movement)

मनसेकडून सविनय कायदेभंग करत मुंबईकरांसाठी लोकल प्रवास, सविनय कायदेभंग म्हणजे काय?
Follow us on

नवी मुंबई : मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली. मनसेकडून सविनय कायदेभंग करत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी लोकलमधून प्रवास केला. रेल्वे पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत या मनसे नेत्यांनी रेल्वे प्रवास केला. तर ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांना रेल्वे प्रवासाची परवानगी नाकारत नौपाडा पोलिसांना ताब्यात घेतलं. मात्र काही तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली. (What Is Civil Disobedience Movement)

मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ठिक-ठिकाणच्या रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळला.

नाकावर टिच्चून रेल्वे प्रवास – संदीप देशपांडे 

“सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करा, अशी विनंती अनेक वेळा सरकारला केली होती. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. बसमध्ये कोरोना पसरत नाही, रेल्वेमध्ये पसरतो असा सरकारचा समज झाला असावा. आज आम्ही कायदेभंगाची हाक दिली होती. त्याप्रमाणे आज नाकावर टिच्चून आम्ही हा रेल्वे प्रवास करत आहोत,” अशी प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली.

सविनय कायदेभंग म्हणजे काय ?

सविनय कायदेभंग याचा अर्थ, ‘नम्रपणे कायदा मोडणे व शासनाचा निषेध करणे होय!’ या अगोदर सविनय कायदेभंग महात्मा गांधीनी काही मागण्या ब्रिटिश सरकार पुढे मांडल्या होत्या. तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करुन दडपशाही सुरु केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून महात्मा गांधीजीच्या नेतृत्वात फेब्रुवारी 1930 साली जुलमी ब्रिटिश राजवटी विरोधात सविनय कायदेभंग चळवळीला सुरूवात झाली हा झाला भूतकाळ.

पण आता महाविकास आघाडी सरकार देखील नागरिकांवर दडपशाही आणत आहे. तीन पक्ष एकत्र नांदत नाहीत, एकमताने निर्णय घेत नाहीत यात सर्वसामान्य नागरिक भरडले जाता आहे, याच देखील त्यांना भान नाही. बसने कोरोना होत नाही, परंतु लोकलने कोरोनाचा प्रादुर्भाव लगेच वाढतो, असं या सरकारचं बालिश म्हणणं असल्याची टीका मनसेने केली आहे.

मुंबईत जिथे लोकलने 200-300 रुपये खर्च होतात तिथे कामगारांचा खर्च 2000 – 2500 रुपये होतो आहे. यांचा भुर्दंड नागरिकांनाच बसतो आहे. निवेदनाची भाषा हे सरकार समजत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 21 सप्टेंबरला सविनय कायदेभंग म्हणजेच नम्रपणे कायदा मोडून शासनाचा निषेध केला जाणार आहे. (What Is Civil Disobedience Movement)

संबंधित बातम्या : 

MNS protest | मनसेचा सविनय कायदेभंग, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास

MNS Protest| पाच मिनिटं द्या, लोकल प्रवास करतो, मग गुन्हा दाखल करा : अविनाश जाधव