
आगामी विधानसभा निवडणुकीधी महायुती सरकारने महिलांसाठी नवनवीन योजना आणल्या आहेत. यामधील लाडकी बहीण योजनेचा प्रचार राज्यभर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या योजनांविरोधात काँग्रेस नेते अनिल वडपल्लीवार यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. यावरूनच नागपूरमधील लाडकी बहीण कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडपल्लीवारांवर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते अनिल वडपल्लीवार नेमके कोण आहेत जाणून घ्या.
मी कोर्टात गेलो नाही. मी उद्या बोलणार आहे. माझं म्हणणं मांडणार आहे. मी उद्या सर्व बोलणार आहे. आज माझ्या तोंडून नका वदवून घेतो. कोर्टात मॅटर आहे, कुणाचाही पीए राहिलो नाही. माझ्या वकिलांचा सल्ला घेतो. माझा अनेक लोकांशी संबंध आला आल्याचं अनिल वडपल्लीवार यांनी म्हटलं आहे.
अनिल वडपल्लीवार यांनी ‘लाडकी बहीण योजनेसह मोफत लाभांच्या विविध शासकीय योजनांना नागपूर खंडपीठात आव्हान देत याचिका दाखल केली आहे. राज्याची बिकट आर्थिक स्थिती लक्षात घेता लाडकी बहीण योजनेसह मोफत लाभाच्या इतर योजना आणि त्यासंदर्भातले राज्य सरकारची निर्णय अवैध घोषित करण्याची मागणी अनिल वडपल्लीवार यांनी त्यांच्या याचिकेतून केली आहे. सार्वजनिक हिताची कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडे आवश्यक रक्कम शिल्लक राहत नाही. त्यामुळे या योजना राज्याच्या हिताकरिता धोकादायक असल्याचे वडपलिवार यांनी त्यांच्या याचिकेत नमूद केले आहे. ज्यायाप्रकरणी नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्याला या प्रकरणाची सद्यस्थिती, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश तसेच फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट कायद्यातील तरतुदींची माहिती 2 आठवड्यात न्यायालयाच्या रेकॉर्डवर सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
नाना पटोले यांचे निवडणूकप्रमुख होते, सुनील केदार यांचे राईट हँड म्हटलं जातं. माझ्या बहिणींनी एक गोष्ट सांगतो, तुमचा देवा भाऊ या ठिकाणी आहे, हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू पण या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर वडपल्ली हा आडवा पडणार आहे, कारण लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात गेला. पण न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली, असं एकनाथ शिंदे म्हणाले. यावर नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल वडपल्लीवार हे काँग्रेस पक्षासोबत काही संबंध नाही. लाडकी बहीणत तुमची फसवी योजना आहे. बहिणीच्या हातातू 100 रूपये घ्यायचे आणि तिच्या हातात पाच रूपये द्यायचे. महागाई वाढवली आहे. फसव्या योजनेसाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत असल्याचं नाना पटोले म्हणाले.