एण्डोस्कोपीमध्ये विश्वविजेते, पद्मश्रीने सन्मान, शरद पवारांवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर कोण?

Rohit Dhamnaskar

Rohit Dhamnaskar |

Updated on: Mar 31, 2021 | 12:58 PM

डॉ. अमित मायदेव हे देशातील आघाडीचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि एन्डोक्सोपी शस्त्रक्रिया करण्यात निष्णात आहेत. | Amit Maydeo Sharad Pawar

एण्डोस्कोपीमध्ये विश्वविजेते, पद्मश्रीने सन्मान, शरद पवारांवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर कोण?
अमित मायदेव यांचा जन्म मुंबईच्या गिरगाव येथे झाला आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर नुकतीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार (Sharad Pawar) यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. (NCP chief Sharad Pawar surgery at breach candy hospital in Mumbai)

ही शस्त्रक्रिया आज म्हणजे 31 मार्चला होणार होती. मात्र, काल संध्याकाळपासून शरद पवार यांच्या पोटात प्रचंड दुखायला लागले होते. त्यामुळे शरद पवार यांना मंगळवारी रात्रीच ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

ब्रीच कँडीमधील विशेष डॉक्टरांच्या पथकाने अर्धा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांच्या पित्तनलिकेतील खडा एन्डोस्कोपीद्वारे बाहेर काढला. डॉ. अमित मायदेव (Amit Maydeo) यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. डॉक्टरांच्या या पथकात डॉ. गोलवाला, डॉ. प्रधान, डॉ. दफ्तरी, डॉ. समदानी, डॉ. टिबरेवाला यांचा समावेश होता.

कोण आहेत डॉ. अमित मायदेव?

डॉ. अमित मायदेव हे देशातील आघाडीचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पोटांच्या विकाराचे तज्ज्ञ) आणि एन्डोक्सोपी (दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया) शस्त्रक्रिया करण्यात निष्णात आहेत. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल 2013 मध्ये डॉ. अमित मायदेव यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

डॉ. अमित मायदेव यांचा जन्म मुंबईच्या गिरगाव येथे झाला आहे. डॉ. अमित मायदेव यांनी मुंबईतच पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डॉ. मायदेव यांनी सर्जरीत स्पेशलायझेशन केले. दरम्यानच्या काळात जर्मनीतील एका रुग्णालयात त्यांचा एन्डोस्कोपीच्या तंत्रज्ञानाशी परिचय झाला.

एन्डोस्कोपीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर डॉ. अमित मायदवे यांनी मुंबईत बालडोटा इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्स हे देशातील पहिले एन्डोस्कोपी सेंटर स्थापन केले.  शिकागो येथे 2012 साली पार पडलेल्या वर्ल्ड कप ऑफ एन्डोस्कोपी स्पर्धेत डॉ. अमित मायदेव हे विजयी ठरले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांची ख्याती आहे. सध्या ते ब्रीच कँडी आणि जसलोक रुग्णालयात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागात मानद सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

संबंधित बातम्या:

शस्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळेंनी ट्विट केला शरद पवारांचा फोटो, म्हणाल्या…

Sharad Pawar | शरद पवारांची विचारपूस करण्यासाठी नारायण राणे सहकुटुंब ब्रीच कँडीत

Sharad Pawar health update : पोटदुखी आणि पित्ताशयाचा त्रास, शरद पवारांना नेमकं काय झालंय?

(NCP chief Sharad Pawar surgery at breach candy hospital in Mumbai)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI