Lawyer Rizwan Merchant, Navneet Rana : आधी संजय दत्तसाठी लढले, आता नवनीत राणांच्या पाठी खंबीर उभे; कोण आहेत रिजवान मर्चंट?

मातोश्रीबाहेर शिवसैनिक येऊन थांबल्याने नवनीत राणा आणि रवी राणा मातोश्रीवर आले नाहीत.

Lawyer Rizwan Merchant, Navneet Rana : आधी संजय दत्तसाठी लढले, आता नवनीत राणांच्या पाठी खंबीर उभे; कोण आहेत रिजवान मर्चंट?
आधी संजय दत्तसाठी लढले, आता नवनीत राणांच्या पाठी खंबीर उभे; कोण आहेत रिजवान मर्चंट?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 8:18 PM

मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून रणकंदन सुरू आहे. नवनीत राणा (navneet rana) यांनी कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणारच असा हेका लावल्यानंतर शिवसैनिकांनी (shivsena) मातोश्रीबाहेर तोबा गर्दी केली. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांना मातोश्रीवर येऊनच दाखवा असं आव्हान दिलं. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर लगेच शिवसैनिकांनी राणांच्या घराच्या खाली जाऊन जोरदार आंदोलन केलं. त्यामुळे आणखीनच तणाव निर्माण झाला. राणा दाम्पत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची सबब पुढे करून आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं. पण शिवसैनिक काही राणा कुटुंबीयांच्या घराबाहेरून हटेनात. एवढं कमी होतं की काय राणा यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. त्यानंतर त्यांना अटकही झाली. त्यामुळे त्यांच्या मदतीला प्रसिद्ध वकील रिजवान मर्चंट (Lawyer Rizwan Merchant) धावून गेले आहेत. मर्चंट हे राणा यांची बाजू कोर्टात मांडणार आहेत. या केसमुळे पुन्हा एकदा मर्चंट चर्चेत आले आहेत.

दिवसभरात काय घडलं?

राणा दाम्पत्य आज सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार होते. मात्र, मातोश्रीबाहेर शिवसैनिक येऊन थांबल्याने नवनीत राणा आणि रवी राणा मातोश्रीवर आले नाहीत. उलट शिवसैनिकांनी राणा यांच्या घराच्या खाली जाऊन जोरदार निदर्शने केली. त्यानंतर दुपारी रवी राणा यांनी आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, असं जाहीर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येत आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून आंदोलन मागे घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर संध्याकाळी राणा दाम्पत्यांविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे पोलीस राणा दाम्पत्यांना अटक करण्यासाठी आले. त्यावेळी नवनीत राणा यांनी अटक वॉरंटची मागणी करत हुज्जत घातली. त्यामुळे अटकेचा हाय व्होल्टेज ड्रामा निर्माण झाला.

कोण आहेत मर्चंट?

  1. रिजवान मर्चेंट हे प्रसिद्ध वकील आणि कायदे तज्ज्ञ आहेत. 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांनी अभिनेता संजय दत्त यांचं वकीलपत्रं घेतलं होतं. तेव्हापासून ते प्रकाश झोतात आले होते. हा खटला बराच काळ चालला होता.
  2. अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. मुनव्वरली साहिल ए, सैय्यद यांनी कंगना विरोधात तक्रार केली होती. या सय्यद यांचं वकीलपत्रंही मर्चंट यांनी घेतलं होतं. न्यायामूर्ती एस एस शिंदे आणि न्यायामूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठात ही केस सुरू होती.
  3. साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या मालेगाव प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत करण्याच्या प्रकरणातही मर्चंट यांनी पत्रकारांचं वकील पत्रं घेतलं होतं. या प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत घेण्याची मागणी एनआयएने केली होती. त्याला मुंबईतील पत्रकारांनी विरोध केला होता. विविध चॅनेल आणि वर्तमानपत्रातील 11 पत्रकारांनी हा विरोध केला होता. त्याच्यावतीने रिजवान मर्चंट यांनी कोर्टात बाजू मांडली होती.

दु:खाचा डोंगर

नऊ वर्षापूर्वी रिजवान मर्चंट यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. जून 2013मध्ये माहीम येथे अल्ताफ मेन्शन नावाची इमारत कोसळली होती. या इमारतीत मर्चंट यांचा मुलगा फराज, पत्नी असिफा आणि ताहिरा यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यांच्यावरचा हा सर्वात मोठा घाला होता. त्यांचे कुटुंबीय या दुर्घटनेच्या काही दिवसांपूर्वीच तुर्कीहून परतले होते. त्यानंतर ही घटना घडली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.