नवाब मलिक काही वाचवायला येणार नाहीत, नितेश राणे असं का म्हणालेत

| Updated on: Oct 01, 2022 | 4:46 PM

पीडित मुलगी ही अल्पवयीन होती. मग, पोक्सो कलम का दाखलं केलं नाही.

नवाब मलिक काही वाचवायला येणार नाहीत, नितेश राणे असं का म्हणालेत
Image Credit source: t v 9
Follow us on

Tv9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : टिळकनगर येथील पीडितेची भाजप नेते नितेश राणे यांनी भेट घेतली. ते म्हणाले, तपासावर मी समाधानी नाही. पीडितेचं कुटुंब दहशतीत आहे. पोलिसांच्या तपासावर आम्ही समाधानी नाहीत. पीडितेच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. महिला आणि पुरुष हवालदार तिथं असेल. पोस्को कलम कसं लागेल. अॅट्रासिटी कसा लागेल, असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला.

नितेश राणे म्हणाले, येवढे दिवस झाले. अजून पोलीस चौकशीच करतात. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा करणार आहे. मुंबईत अशापद्धतीनं पोलीस चौकशी करत असतील. तर असे प्रकार थांबणारचं नाही. कुठल्या मुंबईत आपण राहतो. भीतीचं वातावरण आहे.

मुंबईत पीडितेचं कुटुंबीय सुरक्षित नसेल, तर संबंधित पोलिसांना किती दिवस ठेवायचं यावर विचार करावा लागेल. आम्ही आल्यानंतर एसीपीला यायची गरज का भासते. पीआय सक्षम नाही का, असा सवाल नितेश राणे यांनी केला.

वरिष्ठ प्रतिनिधींशी बोलून आमचं सरकार कोणत्या पद्धतीनं काम करतं. हे सरकार हिंदूंना संरक्षण कसं देतं हे येणाऱ्या काळात आम्ही दाखवू, असा इशारा त्यांनी पोलिसांना दिला.

पीडित मुलगी ही अल्पवयीन होती. मग, पोक्सो कलम का दाखलं केलं नाही. हे काही महाविकास आघाडीचं सरकार नाही. नवाब मलिक हे काही वाचवायला येणार नाही. अस्लम शेख वाचवायला येणार नाहीत. एकंदरित पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली.

काही बदललं जाणार नाही. कुटुंबीयांच्या संपर्कात मी आहे. कुणाचा दबाव असेल. तर ते माझ्याशी बोलतील. त्यानंतर काय करायचं ते आम्ही बघू, असा इशाराही त्यांनी दिला.