अनिल परबांनी असं काय केलं की, रामदास कदम लोकायुक्तांच्या कारवाईवर व्हेरी गुड… व्हेरी गुड म्हणतायत?

शिवसेनेचे आक्रमक नेते रामदास कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यांचा कथित पीए प्रसाद कर्वे यांच्यासोबतच्या संभाषणाची ही क्लिप आहे.

अनिल परबांनी असं काय केलं की, रामदास कदम लोकायुक्तांच्या कारवाईवर व्हेरी गुड... व्हेरी गुड म्हणतायत?
anil parab
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 6:49 PM

मुंबई: शिवसेनेचे आक्रमक नेते रामदास कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यांचा कथित पीए प्रसाद कर्वे यांच्यासोबतच्या संभाषणाची ही क्लिप आहे. या क्लिपमध्ये कर्वे हे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कार्यालयावर हातोडा पडणार असल्याचं कदम यांना सांगत आहेत. तर कदम त्यावर व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणताना ऐकायला मिळतंय. रामदास कदम यांनी या क्लिपशी काही संबंध नसल्यांचं सांगितलं असलं तरी या कथित ऑडिओ क्लिपमुळे कदम यांच्या अडचणीत आले आहेत.

काय आहे संभाषण?

रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांचं हे कथित संभाषण व्हायरल झालं आहे. 1 मिनिट 10 सेंकदाची ही क्लिप आहे. या क्लिपमध्ये कर्वे हे कदम यांना परब यांच्या कार्यालयावर कारवाई होणार असल्याचं सांगत आहे. अनिल परब यांचं कार्यालय तोडण्याची ऑर्डर निघालेली आहे. लोकायुक्तांनी ही ऑर्डर काढली असून एक महिन्याच्या आत हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत, असं कर्वे कदम यांना सांगतात. वांद्रे येथील म्हाडाच्या दोन इमारतीमध्ये परब यांचं हे कार्यालय असल्याचं कर्वे सांगतात. त्यावर व्हेरी गुड व्हेरी गुड…ऑर्डरची कॉपी आहे का? असा सवाल कदम करतात. त्यावर आजच ऑर्डर निघाली असून दोन दिवसात कॉपी हाती येईल, असं कर्वे सांगताना दिसत आहेत. त्यावर अच्छा. म्हणजे आता परब यांच्यावर गुन्हा दाखल होईल तर असं कदम म्हणत असल्याचं ऐकायला मिळतं.

कथित संभाषण जसंच्या तसं

रामदास कदम: हॅलो
प्रसाद कर्वे: भाई ते अनिल परबचं कार्यालय तोडायची ऑर्डर झालीय
रामदास कदम: कुठलं कार्यालय
प्रसाद कर्वे: वांद्र्याचं कार्यालय होतं बघा, म्हाडाच्या दोन इमारतीमधलं.
रामदास कदम: वाह… व्हेरी गुड. व्हेरी गुड
प्रसाद कर्वे: लोकायुक्तांनी ऑर्डर दिलीय. एक महिन्याच्या आत बांधकाम पाडून टाकावं.
रामदास कदम: मग त्याच्यावर गुन्हाही दाखल होईल ना
प्रसाद कर्वे: हो गुन्हाही दाखल होणार.
रामदास कदम: गुन्हा दाखल झाला तर राजीनामा द्यावा लागेल मग
प्रसाद कर्वे: हो हो
रामदास कदम: गुन्हा दाखल झाला ना तर मग त्याला रिझाईन द्यावा लागेल ना.
प्रसाद कर्वे: होय होय…
रामदास कदम: असं काय
प्रसाद कर्वे: हो
रामदास कदम: व्हेरी गुड व्हेरी गुड… त्याची कॉपी आहे का तुझ्याकडे?
प्रसाद कर्वे: नाही. आज ऑर्डर झालीय. पण दोन दिवसांनी कॉपी मिळेल.
रामदास कदम: ओके ओके…
प्रसाद कर्वे: हां हां
रामदास कदम: ऑर्डर झाली तर अनधिकृत बांधकाम केलं म्हणून गुन्हाही दाखल करावा लागेल. एमआरटीपीच्या माध्यमातून गुन्हा होईल ना दाखल
प्रसाद कर्वे: हो हो, होईल ना… होईल ना… करणार आहे तो.
रामदास कदम: हम्म
प्रसाद कर्वे: किरीट सोमय्या करणार आहे.
रामदास कदम: ओके ओके ओके ओके

WhatsApp Audio 2021-10-02 at 4.05.43 PM(3)

परब यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, लोकायुक्तांनी हे कार्यालय पाडण्याचे आदेश दिल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली होती. या कार्यालयाशी आपला काही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

काय आहे प्रकरण?

परब यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी 2019 मध्ये केला होता. त्यानुसार त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. परब यांनी वांद्रे पूर्वेकडील गांधी नगर येथील इमारत क्रमांक 57 आणि 58 मधील मोकळ्या जागा बळकावून अनधिकृत बांधकाम केले असल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती. याप्रकरणी चौकशी करून अनधिकृत बांधकाम तोडून संबंधित जागा नागरिकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली आणि त्याचा रिपोर्टही किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे. या सुनावणीमध्ये लोकायुक्तांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

काही दिवसांपूर्वीही किरीट सोमय्या यांनी या अनधिकृत जागेवर भेट देत तिथे मोठा गदारोळ घातला होता. ती दृष्य सगळ्यांनीच पाहिली होती. आत्ता गंमत पाहा, अनिल परब यांनी हे कार्यालय त्यांच्या नावे नसल्याचे म्हाडा अधिकर्यांना सांगितले आहे. त्यानुसार म्हाडा अधिकाऱ्यांनी अनोळखी व्यक्तीच्या नावे ही नोटीस पाठवल्याची सुत्रांकडून माहिती मिळतेय. उच्च न्यायालयाच्याआदेशानुसार राज्य सरकारने अनधिकृत बांधकामांवर 30 सप्टेंबर पर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते.

संबंधित बातम्या:

रामदास कदम यांच्या तीन ऑडिओ क्लिप व्हायरल; शिवसेनेत खळबळ; वाचा, संभाषण जसेच्या तसे

कोण कुणाला संपवतंय? कोण कुणाच्याविरोधात आरोप करतंय? शिवसेनेतल्या भूकंप केंद्राचे सगळे धागेदोरे समजून घ्या

ते पाप माझ्या हातून होणार नाही, व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदम यांची पहिली प्रतिक्रिया

(why ramdas kadam happy while action against anil parabs office, audio clip goes viral)