नवरा पसंत नाही, लग्नाच्या दोन महिन्यानंतर नवऱ्याची हत्या

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : नवरा पसंत नसल्याने नवविवाहितेने त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. विवाहितेने चोरी झाल्याचा कांगावा करत चोरट्यांकडून झालेल्या मारहाणीत नवऱ्याचा मृत्यू झाल्याची तक्रार कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. परंतू पोलिसांनी केलेल्या तपासात पत्नीनेच नवऱ्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. कल्याण पूर्व येथील कोळशेवाडीच्या दुर्गामाता परिसरात राहणाऱ्या वृषालीचे गेल्या वर्षी 29 डिसेंबरला […]

नवरा पसंत नाही, लग्नाच्या दोन महिन्यानंतर नवऱ्याची हत्या
Follow us on

मुंबई : नवरा पसंत नसल्याने नवविवाहितेने त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. विवाहितेने चोरी झाल्याचा कांगावा करत चोरट्यांकडून झालेल्या मारहाणीत नवऱ्याचा मृत्यू झाल्याची तक्रार कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. परंतू पोलिसांनी केलेल्या तपासात पत्नीनेच नवऱ्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

कल्याण पूर्व येथील कोळशेवाडीच्या दुर्गामाता परिसरात राहणाऱ्या वृषालीचे गेल्या वर्षी 29 डिसेंबरला जगदीश साळुंकेशी लग्न झालं. मात्र लग्नानंतर काहीच दिवसांत या नवरा-बायकोमध्ये खटगे उडू लागले. त्या दोघांमध्ये रोज भांडणं व्हायची. जगदीशने अनेकदा पत्नी वृषालीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृषाली काहीही ऐकायला तयार नव्हती, कारण तिला जगदीश पसंत नव्हता.

जगदीश पसंत नसल्याने ती नेहमी त्याच्यासोबत वाद घालायची. इतकंच नाही तर तिने काहीदिवसांपूर्वी जेवणात विष मिसळत जगदीशची हत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी तिचा डाव फसला. त्यानंतर 6 मार्चला वृषाली अचानक कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने पतीची हत्या झाल्याचं पोलिसांना सांगितलं. चोरीच्या उद्देशाने आलेल्यांनी जगदीशची हत्या केल्याचा कांगावा तिने केला. पोलिसांनी पंचनामा करुन जगदीशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपास सुरु केला.

कोळशेवाडी पोलिसांना तपासादरम्यान काही गोष्टी खटकल्या. एकतर ही घटना चोरीच्या उद्देशाने झाली तर वृषालीला चोरांनी काहीच का केलं नाही. तसेच, त्यांच्या घरातून कुठलीही वस्तू चोरीला गेली नव्हती. त्यामुळे पोलिसांना वृषाली खोटं बोलत असल्याचा संशय आला. त्यानंतर वृषालीची कसून तपासणी केल्यानंतर तिने तिचा गुन्हा कबुल केला, तिनेच जगदीशची हत्या केली होती. या हत्येमध्ये वृषालीचा कोणी साथीदार होता की तिने ही हत्या स्वत:च केली, पोलीस सध्या या दृष्टीने तपास करत आहेत.