AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवार यांनी एका वाक्यात काय दिलं उत्तर?

राज्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पूर्णविराम दिला आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटींनंतर या चर्चांना उधाण आले होते. या चर्चांवर अखेर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी अवघ्या एका वाक्यात उत्तर देऊन हा विषय थांबवला आहे.

सर्वात मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवार यांनी एका वाक्यात काय दिलं उत्तर?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 28, 2026 | 2:30 PM
Share

राज्यात गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत गाठीभेटी झाल्या. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर देऊन हा विषय संपवला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर विचारलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या देशभरात चर्चा सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादी खरंच एकत्र येणार आहे का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर पवार यांनी अवघ्या एका वाक्यात उत्तर दिलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी अत्यंत मोजक्या शब्दात उत्तर देऊन हा विषयच संपवल्याचं बोललं जात आहे.

गुन्हे मागे नाहीच

दरम्यान, नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी विद्यार्थ्यांनी देशभर आंदोलन केलं. याप्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंद्र सरकारने सीजेपीला आश्वासन देऊनही हे गुन्हे मागे घेतले जात नाहीत. त्याबाबतही शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर मी याबाबत पंतप्रधानांशी बोललो आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

चर्चा कशी सुरू झाली?

दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होण्याची चर्चा अचानक सुरू झाली नाही. तर शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत भेट घेतली होती. त्यांच्याशी चर्चा केली होती. नीट आंदोलनाबाबत ही चर्चा झाली होती. त्यानंतर दोन दिवसाने शरद पवार एनडीएसोबत जाणार असल्याची बातमी आली. पवारांनी मोदींची भेट घेतली तेव्हाच पवार एनडीएसोबत जाण्याचा निर्णय झाल्याचंही सांगितलं जात होतं. अर्थात ही सर्व सूत्रांची माहिती होती. अधिकृत असं काही नव्हतं. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी एक दोन दिवसाच्या फरकाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार असल्याच्या बातम्या येऊन धडकल्या. भाजपने विलिनीकरणाची अट ठेवल्याचंही सांगितलं गेलं. त्यामुळेच पवारांना आज त्याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी या सर्व गोष्टींना पूर्णविराम दिला आहे.

Follow Us
हि शान कोणाची? लालबागच्या राजाची; राजाचं प्रथम दर्शन! व्हिडिओ बघाच
हि शान कोणाची? लालबागच्या राजाची; राजाचं प्रथम दर्शन! संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?