Uday Samant: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान मंत्री उदय सामंत यांचे थेट उत्तर

Uday Samant on Shivsena Merger: एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असाही सुरू आवळल्या गेला आहे. त्यावर शिंदे सेनेच्या गोटातील काही नेत्यांनी मत व्यक्त केलेले असताना मंत्री उदय सामंत यांनी या घडामोडींवर थेट उत्तर दिले आहे.

Uday Samant: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान मंत्री उदय सामंत यांचे थेट उत्तर
दोन्ही शिवसेना एकत्र येणार? मंत्री उदय सामंत म्हणाले काय?
| Updated on: Nov 13, 2026 | 12:45 PM

Uday Samant on Shivsena Merger: राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी गदारोळ उठवला आहे. गेल्या दहा दिवसांपासून विलिनीकरणाच्या चर्चांना मोठे उधाण आले आहे. भेटीगाठीच्या सत्राने त्याला हवा दिली आहे. त्याचवेळी दोन्ही गोटातील काही नेते या चर्चाही फेटाळून लावत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना एकत्रि‍करणाचे पडघम वाजत आहेत. शिंदे सेनेच्या गोटातील काही नेत्यांनी विलिनीकरणावर भाष्य केले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दोन्ही पक्ष एकत्र आले तर आपल्याला सर्वाधिक आनंद होईल असे मत व्यक्त केले आहे. या सर्व घडामोडींवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मत व्यक्त केले आहे.

विलिनीकरणावर सामंत म्हणाले काय?

Loading...

त्यांचे ते वैयक्तिक मत आहे. एकत्रित यायचे की नाही यायचे हे ठरवण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्याच्यामुळे कोणी कुणासोबत जायचे ही जर चर्चा केली. मी जर मत मांडलं, पण माझ्यापेक्षा हायर ऑथॉरिटी हे शिंदे साहेब आहेत. विलिनीकरण असेल अथवा एकत्रि‍करणाचा मुद्दा असेल त्यावर मला बोलण्याचे अधिकार नाहीत. या धोरणात्मक निर्णयावर एकनाथ शिंदे बोलतील आणि तेच निर्णय घेतील, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मत मांडले.

शिंदे यांचे नेतृत्व हे सर्वमान्य

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात उद्योगमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. माझा चेहरा महाराष्ट्रासमोर आणण्याचे काम शिंदे साहेबांनी केले. आमच्यासारखे अनेक नेते शिंदे यांच्यामुळे पुढे आले. परंतु काही लोकांना ते दिसत नाही. कळत नाही. त्याच्यावर फार काही बोलण्यापेक्षा पुढे जावे. मला असं दाखवावं की, शिंदे साहेब जालन्यात एका झोपडीत जाऊन जेवले. त्यांची कांदाभाकर खाल्ली. कांदा खाल्ला. त्यांच्याशी चर्चा केली, असे उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीतील डायलिसिस सेंटर्स बंद होणार नाहीत

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस यंत्रणा सुस्थितीत सुरू आहे. १,११३ रुग्णांवर मोफत डायलिसिस उपचार सुरू आहेत. एचएलएल कंपनीची पाच स्वतंत्र युनिट कार्यरत आहेत. ही यंत्रणा बंद पडू नये, यासाठी संबंधित कंपनीला स्पष्ट शब्दांत समज दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीची मशीन बाहेर जाऊ न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पाचही डायलिसिस सेंटरमध्ये स्थानिक टेक्निशियन कार्यरत आहेत. प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही डायलिसिस सेंटर सुरू ठेवण्यात येतील. रत्नागिरी जिल्ह्यातील डायलिसिस सेंटर बंद होणार नाहीत, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us