AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फुटपाथवर चालताना महिलेला प्रसूती वेदना, वस्त्रांचा केला आडोसा अन्..; महिला कॉन्स्टेबलचं होतंय कौतुक

मुंबई डोंगरी परिसरात रस्त्यावर चालताना एका 36 वर्षीय गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्या. या वेदना असह्य झाल्याने संंबंधित महिला फूटपाथवरच बसली. अखेर स्थानिकांनी मदतीसाठी पोलिसांना याविषयीची माहिती दिली, परंतु..

फुटपाथवर चालताना महिलेला प्रसूती वेदना, वस्त्रांचा केला आडोसा अन्..; महिला कॉन्स्टेबलचं होतंय कौतुक
pregnant woman and policeImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 03, 2025 | 2:59 PM
Share

मुंबईतील डोंगरी परिसरात फुटपाथवरच एका महिलेची प्रसुती करण्यात आली. या परिसरातून चालत असताना संबंधित गर्भवती महिलेला अचानक वेदना सुरू झाल्या. वेदना असह्य झाल्याने ती महिला फूटपाथवरच विव्हळत बसली. तेव्हा स्थानिकांनी तिची मदत करत याबद्दल पोलिसांना तातडीने माहिती दिली. डोंगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने महिलेला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु जवळच्या रुग्णालयात नेण्याची हालचाल सुरू असतानाच वेदना बळावल्या आणि अखेर महिलेची प्रसुती रस्त्यावरच झाली. नंतर संबंधित महिलेला आणि तिच्या बाळाला इतरांच्या मदतीने तात्काळ जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या तपासणीनंतर आई आणि बाळ दोघंही सुखरुप असल्याचं कळतंय. त्यामुळे प्रसंगावधान राखत मुंबई पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांनी जी कामगिरी केली, त्याबद्दल त्यांचं कौतुक होत आहे.

दोन महिला पोलीस कर्मचारी आणि नवजात शिशूसोबतचा फोटो पोस्ट करत मुंबई पोलिसांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर घटनेबद्दलची माहिती दिली. ‘डोंगरी परिसरातील उमरखाडी इथं एका महिलेला फुटपाथवरच प्रसुती वेदना होत असल्याचं कळताच डोंगरी पोलीस स्टेशनचे अधिकारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. प्रसुतीनंतर संबंधित महिलेला आणि नवजात बाळाला महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक महिलांच्या मदतीने सुरक्षितपणे जे. जे. रुग्णालयात नेलं. आई आणि बाळाची प्रकृती आता चांगली आहे’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय.

मुंबई पोलिसांची पोस्ट-

डोंगरी परिसरातून चालत असताना अचानकपणे 36 वर्षीय माला नाडर या गर्भवती महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या. फुटपाथवरच वेदनेनं विव्हळत असताना स्थानिकांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेण्याची हालचाल सुरू केली. त्यादरम्यान महिलेच्या वेदना आणखी तीव्र झाल्या आणि तिथेच प्रसूती झाली. यावेळी पोलिसांनी स्थानिक महिलांच्या मदतीने चादर, वस्त्र घेऊन आडोसा तयार केला. त्यानंतर संबंधित महिलेला आणि बाळाला वस्त्रामध्ये गुंडाळून जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आलं. रुग्णालयात डॉक्टरांनी बाळाची नाळ कापली आणि त्यानंतर तपासणी केली. बाळ आणि बाळंतीण सुखरुप असल्याचं त्यांनी सांगितलं.

Follow Us
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?