कोण होणार पंतप्रधान? उत्तर सांगा आणि झोमॅटोवर कॅशबॅक मिळवा

मुंबई : दोन दिवसांनी म्हणजेच 23 मे रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. मात्र निकालापूर्वी ऑनलाईन फुड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने ग्राहकांना एक ऑफर दिली आहे. ग्राहकांनी जर 23 मे पूर्वी देशाचे पंतप्रधान कोण होणार? याबद्दल अचूक भविष्यवाणी केली आणि तुमची भविष्यवाणी खरी ठरली, तर तुम्हाला फुड ऑर्डरवर कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. ‘झोमॅटो इलेक्शन लीग’च्या या ऑफरमध्ये […]

कोण होणार पंतप्रधान? उत्तर सांगा आणि झोमॅटोवर कॅशबॅक मिळवा
झोमॅटो आपल्या युजर्सना देतेय ‘अनलिमिटेड फ्री डिलीव्हरी’
| Edited By: | Updated on: May 21, 2019 | 10:42 AM

मुंबई : दोन दिवसांनी म्हणजेच 23 मे रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. मात्र निकालापूर्वी ऑनलाईन फुड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने ग्राहकांना एक ऑफर दिली आहे. ग्राहकांनी जर 23 मे पूर्वी देशाचे पंतप्रधान कोण होणार? याबद्दल अचूक भविष्यवाणी केली आणि तुमची भविष्यवाणी खरी ठरली, तर तुम्हाला फुड ऑर्डरवर कॅशबॅक ऑफर मिळणार आहे.

‘झोमॅटो इलेक्शन लीग’च्या या ऑफरमध्ये देशात 23 मे नंतर पंतप्रधान कोण होणार?, यावर अचूक भविष्यवाणी करणाऱ्या ग्राहकाला कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. ग्राहकाला प्रत्येक ऑर्डरवर 40 टक्के डिस्काऊंट दिला जाणार आहे आणि जर भविष्यवाणी खरी ठरली, तर त्यांना 30 टक्के कॅशबॅकही मिळणार आहे”, असं झोमॅटो कंपनीने सांगितलं.

“निकालानंतर देशाचा पंतप्रधान निवडला जाईल आणि तुमचे उत्तर बरोबर असेल तेव्हा ऑटोमेटिक ग्राहकांच्या वॉलेटमध्ये कॅशबॅक आलेली असेल”, असंही झोमॅटोने सांगितलं.

या ऑफरचा फायदा 22 मे पर्यंत तुम्ही घेऊ शकता. आतापर्यंत या ऑफरमध्ये 250 शहरांमधील 3 लाख 20 हजार लोकांनी सहभाग घेतला आहे.

यापूर्वीही झोमॅटोने ‘झोमॅटो प्रिमियर लीग’च्या माध्यमातून ग्राहकांना इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) चा विजेता कोण ठरणार याबद्दल अचूक भविष्यवाणी केलेल्या ग्राहाकांना कॅशबॅक ऑफर दिली होती.