AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

 उर्दूमध्ये काहीतरी पुटपुटत बाबाने महिलेच्या चेहऱ्यावर फुंकर मारली अन्… एअर फोर्स जवानाच्या पत्नीवर बलात्कार, धर्मांतराचा प्रकार

एअर फोर्स जवानाच्या पत्नीवर बलात्कार, धर्मांतराच्या प्रकरणामुळे सर्वत्र संतापाचं वातावरण आहे... तो उर्दूमध्ये काहीतरी पुटपुटत राहिला आणि महिलेच्या चेहऱ्यावर फुंकर मारत राहिला.. त्यानंतर बेशुद्ध झालेली महिला शुद्धीत आल्यानंतर समोर आलेलं चित्र भयानक होतं..

 उर्दूमध्ये काहीतरी पुटपुटत बाबाने महिलेच्या चेहऱ्यावर फुंकर मारली अन्... एअर फोर्स जवानाच्या पत्नीवर बलात्कार, धर्मांतराचा प्रकार
| Updated on: Jun 17, 2026 | 1:15 PM
Share

तो उर्दूमध्ये काहीतरी पुटपुटत राहिला आणि महिलेच्या चेहऱ्यावर सतत फुंकर मारत राहिला… महिला ओरडत, किंचाळत राहिली. बाजूला ठेवलेल्या एका बाटलीत पाणी होतं. पुरुषाने महिलेचे दोन्ही हात पकडले आणि तिला स्वतःच्या नियंत्रणात घेत राहिली… महिला सतत म्हणत होती मला सोड… मला सोड… पण तो काही थांबला नाही… या भयानक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे… मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने पोलिसांत FIR दाखल केला आहे… ज्यामध्ये काळी जादू करण्याचे आरोप करण्यात आले आहे… ज्या महिलेसोबत असं वाईट कृत्य झालं आहे, ती एअर फोर्स जवानाची पत्नी आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्याने असं कृत्य केलं आहे, तो महिलेचा शाळेतील जुना मित्र आहे.

महिलेने केले बलात्कार आण काळी जादू केल्याचे आरोप…

संबंधित घटना नागपूर येथील आहे… एअर फोर्स जवानाच्या पत्नीने ब्लॅकमेलिंग, बलात्कार आणि बळजबरी धर्मांतराचे आरोप अयाज मादरे आणि त्याच्या साथीदारांवर केले आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपीसह दोघांना ताब्यात घेतलं आहे. धर्मांतरास कारणीभूत ठरलेल्या मैलानाचा शोध घेण्यासाठी नागपूर पोलिसांचं एक पथक आता मध्य प्रदेशात पोहोचलं आहे. या खळबळजनक प्रकरणात बलात्कार, वारंवार होणारे लैंगिक शोषण, खंडणी, ब्लॅकमेलिंग, जादूटोणा, बळजबरीने केलेलं धर्मांतर आणि बळजबरीने केलेला विवाह यांसारखे गंभीर आरोप आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला 24 वर्षांची आहे. तिने जुन्या शाळेतील मित्रावर आणि त्याच्या साथीदारांवर बलात्कार, ब्लॅकमेल आणि बळजबरी धर्मांतर यांसारखे गंभीर आरोप करत सोनेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. महिला एक प्रॉपर्टी डिलर आहे. आता पोलिसांनी याप्रकरणी अयाझ मदारे आणि अमीन शेख याला अटक केली आहे.

ड्रिंकमध्ये नशेचं औषध टाकून केलं बेशुद्ध

महिलेच्या आरोपांनुसार, 8 फेब्रुवारी 2025 रोजी एका हॉटेलमधील भेटीदरम्यान अयाझने महिलेच्या ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळलं, ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. तिला शुद्ध आली तेव्हा आरोपीने तिचे आक्षेपार्ह अवस्थेत फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवले होते. त्यानंतर तिचं वारंवार लैंगिक शोषण करण्यात आलं आणि हे व्हिडिओ तिच्या पतीला पाठवण्याची तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यात आलं. एवढंच नाही तर, तिच्याकडून तब्बल 4 लाख रुपयेही उकळण्यात आले.

फुंकर मारून काळी जादू

महिलेने FIR मध्ये केलेल्या आरोपांनुसार, अयाझ कायम एका प्लॅस्टिकच्या बातलीत काहीतरी घेऊन यायचा आणि महिलेला पिण्यास सांगायचा. त्यानंतर तो उर्दूमध्ये काहीतर पुटपुट करायचा आणि तो महिलेच्या चेहऱ्यावर फुंकर मारायचा. एवढंच नाही तर, संमोहन व काळी जादू असल्याचे सांगून तिच्यावर बलात्कार करायचा.

आरोपी मैलानाच्या शोधात पोलीस

डीसीपी सिंगा रेड्डी यांनी सांगितल्यानुसार, संबंधित महिलेने आपल्या तक्रारीत बलात्कार, खंडणी, धर्मांतर आणि जादूटोणा यांसारखे आरोप केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे फॉरेन्सिक विश्लेषण सुरू असून, हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. धर्मांतराशी संबंधित असलेल्या मैलानाचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक दुसऱ्या राज्यात पोहोचलं आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं