AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंगावरची हळदही उतरली नव्हती, नवरा एखाद्या राक्षसासारखा वागू लागला, घटस्फोट मंजूर होताच त्याने ओलांडल्या सर्व मर्यादा

नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. महिलेचं लग्न झालं. लग्नाला दोन दिवसही उलटले नाही तर, नवऱ्या बायकोला राक्षसासारखी वागणूक देण्यास सुरुवात केली. अखेर तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला, कोर्टात घटस्फोट मंजूर देखील झाला. पण त्याने जे काही केलं ते अत्यंत धक्कादायक होतं.

अंगावरची हळदही उतरली नव्हती, नवरा एखाद्या राक्षसासारखा वागू लागला, घटस्फोट मंजूर होताच त्याने ओलांडल्या सर्व मर्यादा
| Updated on: Jun 27, 2026 | 12:39 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून ज्या घटना घडत आहे, त्या अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत. कुठे चिमुकल्या मुलींवर अत्याचार होत आहेत, तर अनेक ठिकाणी महिला घरीच सुरक्षित नाही. सततच्या त्रासा कंटाळून महिला त्यांच्या स्वतःचा मार्ग निवडतात, तरी सुद्धा त्यांचं जगणं फार कठीण असतं. आता देखील असंच काही घडलं आहे. नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचा घटस्फोट मंजूर होताच संतापलेल्या नवऱ्याने पत्नीची हत्या केली. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. सर्व प्रकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.

प्रत्येक मुलीचं एकच स्वप्न असतं आणि ते म्हणजे लग्न झाल्यानंतर सुखी संसार… पण प्रत्येक महिलेच्या आयुष्यात सुखी संसार लिहिलेला नसतो. असंच काही नागपूर येथे राहणारी मंजू हिच्यासोबत झालं आहे. मंजू हिचं 2 वर्षांपूर्वी संदीप पचारे नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. पण अंगावरची हळदही उतरली नव्हती आणि नवऱ्याने मंजू हिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली.

संदीप कायम नशेत घरी यायचा आणि मंजू हिला मारायचा आणि हे मंजू हिच्या आयुष्यात रोजचं झालं होतं. अखेर रोज होणाऱ्या मारहाणीला कंटाळून मंजूने मोठा निर्णय घेतला आणि माहेरी राहायला गेली. त्यानंतर मंजू हिने वर्धा कुटुंब न्यायालयात घटस्फोट अर्ज टाकला होता. कोर्टात तिचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर देखील झाला. पण घटस्फोटाचा अर्ज मंजूर होताच, संतापलेल्या संदीप याने मंजू याची हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून वर्धा न्यायालयात घटस्फोटावर सुनावणी सुरु होती. अखेर कोर्टाचा निकाल मंजू हिच्या बाजूने लागला आणि संदीप याला कोर्टाने दोषी ठरवला. हाच राग मनात ठेवत संदीप याने मंजू याची हत्या केली. निकाल लागल्यानंतर संदीप जुनी कामठी परिसरात आला आणि कोणाला काही कळत नाही, तोपर्यंत त्यानं मंजू हिच्यावर सपासप वार करत तिची हत्या केली.

संदीप याने वार करताच मंजू रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली आणि तिचा घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू झाला. घटना घडताच नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मंजू हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु आहे. पोलीस सध्या या घटनेची कसून तपास करत आहेत.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक