नागपुरात भाजप उमेदवाराच्या पराभवाचं कारण काय? ‘कराळे फॅक्टर’ कसा ठरला कारणीभूत? काँग्रेसने धूळ चारल्यानंतर कोहळेंनी मनातलं सगळं सांगितलं

नागपुरात भाजप उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीनंतर सुधाकर कोहळेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. भाजप उमेदवाराच्या पराभावाला कोण कारणीभूत ठरलं, जाणून घ्या

नागपुरात भाजप उमेदवाराच्या पराभवाचं कारण काय? कराळे फॅक्टर कसा ठरला कारणीभूत? काँग्रेसने धूळ चारल्यानंतर कोहळेंनी मनातलं सगळं सांगितलं
nagpr bjp flag
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 9:09 AM

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निकालाची चर्चा संपूर्ण देशभर होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी देखील 40 हून अधिक तास चालली. या मतमोजणीवेळी सुरुवातीला भाजपच्या कोहळेंनी आघाडी घेतली होती. तर परंतु ऐनवेळी भाजप उमेदवार सुधाकर कोहळे बॅकफूटवर गेले. अभिजीत वंजारी यांना प्रथम आणि द्वितीय पसंती क्रमाकांचं एकूण 67 हजार 231 मते मिळाली. तर भाजपच्या कोहळेंना 63 हजार 960 मते मिळाली आहेत. या निवडणुकीत वंजारी यांनी 3271 इतक्या मतांनी विजय मिळवला. तर अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले नितेश कराळे यांना 25 हजार 908 मते पडल्याचे दिसून आलं.

नागपूरच्या पदवीधर मतदारसंघात अनेक पदवीधरांनी कोहळेंना मतदान केलं. परंतु अनेकांचं मतदान अवैध ठरलं. जवळपास 15 हजार मते अवैध ठरल्याचे दिसून आलं. तर भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर 2 आकडा लिहिल्याने 9000 अवैध ठरल्याचे सांगण्यात आलं आहे.  तब्बल 9 हजार मते अवैध ठरल्याने भाजपला मोठा धक्का बसला. एकीकडे अभिजीत वंजारी यांना 3271 इतकी मते मिळाली. तर भाजपची 9 हजार मते बाद झाली. या पराभवानंतर सुधाकर कोहळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.  कोहळे म्हणाले,  आमच्या वरिष्ठ नेत्यांकडून विश्लेष केलं जाईल. भाजपची जवळपास 9 हजार मते बाद झाली. त्यामुळेच आमचा पराभवाला सामोरे जावं लागलं. भाजप मतदारांनी माझ्या पसंती क्रमांकासमोर एक  क्रमांकाचा आकडा न लिहिता 2 आकडा लिहिला. खरंतर लोकशाहीसाठी असे मतदान योग्य नाही, असे कोहळे यांनी सांगितलं.

Loading...

कराळे फॅक्टर कसा कारणीभूत ठरला? 

तत्पूर्वी, नागपूर पदवीधर मतदारसंघात ही जागा जिंकण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली होती. भाजपच्या सर्व नेत्यांसहित कार्यकर्त्यांनी झोकून प्रचार कामाला सुरुवात केली होती. प्रचाराच्या शेवटच्या दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मैदानात उतरले होते. त्यानंतरही भाजपला परभावाचा सामना करावा लागला. त्यामुळे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने आपली जागा साबूत ठेवत विजय मिळविलेलाय.  काँग्रेसचे अभिजित वंजारी पुन्हा एकदा विजयी ठरले आहेत.  खरंतर या निवडणुकीत नितेश कराळे यांचे दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक ठरली आहेत.   निकाल जाहीर झाल्यानंतर विजयाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी अभिजित वंजारी सहपरिवार पोहोचले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us