AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांच्या पक्ष कार्यालयात लावणी, जाऊ द्या ना घरी गाण्यावर नृत्य सादरीकरण!

अजित पवार यांच्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने पक्षाच्या कार्यालयात लावणी नृत्य सादर केले आहे. या नृत्याचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

अजितदादांच्या पक्ष कार्यालयात लावणी, जाऊ द्या ना घरी गाण्यावर नृत्य सादरीकरण!
ajit pawar
| Updated on: Oct 27, 2025 | 4:12 PM
Share

NCP Lavani Dance Video : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा लावणीवर डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नागपूर कार्यालयातील हा व्हिडीओ आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 महिन्यांपूर्वी पक्षाच्या या कार्यालयाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. याच कार्यालयात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिला पदाधिकारी शिल्पा शाहीर यांनी लावणी नृत्य सादर केलं आहे. याच नृत्याचा व्हिडीओ आता समोर आला असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मला जाऊ द्या ना घरी, वाजले की बारा या गाण्यावर हे लावणी नृत्य सादर करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात मीसुद्धा डान्स केला

आता या नृत्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यावेळी नृत्य सादरीकरणादरम्यान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्यासह शहरातील महिला आणि पुरुष पदाधिकारी उपस्थित होते. याच नृत्याबाबत अनिल अहिरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नागपूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी दिवाळी स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. लावणी महाराष्ट्राची संस्कृती आहे. या कार्यक्रमात मीसुद्धा डान्स केला. बघणाऱ्यांच्या नजरेत दोष आहे,” अशी प्रतिक्रिया अहिरकर यांनी दिली. तसेच आम्ही शिल्पा शाहीर यांचा सत्कारही केला आहे, असेही अहिरकर यांनी सांगितले.

आम्ही महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी नृत्य केले

दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आम्ही पारिवारिक लोक उपस्थित होतो. शिल्पा शाहीर नागपूर शहर उपाध्यक्षा आहेत. सगळे बसलेले आम्ही पदाधिकारी होतो. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लोक उपस्थित होते. आम्ही महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी नृत्य केले. जसा कुटुंबात आनंद साजरा करतो तसा त्यावेळी आनंद साजरा करण्यात आला. ज्यांनी ज्यांनी चांगले सादरीकरण केले त्यांच्यासाठी तरुणांनी वन्स मोअरं केलं. त्यात काही वावगं नाही, असे स्पष्टीकरणही अहिरकर यांनी दिले.

पक्षाचेच बारा वाजले आहेत

शरद पवार यांच्या पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या नृत्य सादरीकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अजित पवार यांच्या पक्षावर सडकून टीका केली आहे. मी व्हिडिओ पाहिला नाही. मात्र लावणीची संस्कृती जपत असतील कदाचित. शरद पवार यांच्या पक्षातून जे सोडून गेले ते असे प्रकार करत आहेत. त्यांनी पक्षाचे पार 12 वाजवून टाकले आहेत, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच शरद पवार यांनी हा पक्ष वाढवला. हा पक्ष लोकांनी घराघरात पोहोचवला. मात्र ते पक्ष चोरून घेऊन गेले. आता ते पक्ष कार्यालयात वाजले की बारा हे गाणं लावत आहेत. पक्षाचेच बारा वाजले आहेत. हे सगळं लाजीरवाणं आहे, असेही पुढे आव्हाड म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...