AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या हिंदू समाजाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरुन वाद, काँग्रेसने त्यांना सुनावलं, फडणवीसांना विचारलं की, हे..

IPS Vishwas Nangare Patil : IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची मंगळवारी नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. ते नुकतेच सकल हिंदू समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथे त्यांनी केलेल्या भाषणावर काँग्रेस नाराज झाली आहे.

IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या हिंदू समाजाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरुन वाद, काँग्रेसने त्यांना सुनावलं, फडणवीसांना विचारलं की, हे..
IPS Vishwas Nangare Patil
| Updated on: Jun 26, 2026 | 12:31 PM
Share

नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सकल हिंदू समाजाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने त्यांच्यावर आरोप केलाय की, त्यांनी RSS आणि त्या संघटनेचे संस्थापक डॉ.के.बी.हेडगेवार यांची प्रशंसा करुन All India Services चे नियम मोडले आहेत. काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारलाय की, विश्वास नांगरे पाटील यांनी कार्यक्रमात सहभागी होण्याआधी तुमची परवानगी घेतली होती का?. ऑल इंडिया सर्विसेज (कंडक्ट) नियमांचा हवाला देत काँग्रेसने दावा केलाय की, IPS अधिकाऱ्याने अशा कार्यक्रमात सहभागी होण्याआधी सरकारची परवानगी घेतली पाहिजे. असा प्रश्न विचारुन काँग्रेसला नांगरे पाटील यांनी अशी परवानगी घेतली होती का? हे जाणून घ्यायचं आहे. जर नाही, तर सरकार त्यांच्याविरोधात कारवाई करणार आहे का?.

“जे आयपीएस अधिकारी RSS, हिंदुत्व आणि आरएसएसचे संस्थापक के.बी. हेडगेवार यांचं कौतुक करतात त्यांची अशी भाषणं नियमांविरुद्ध आहे” असं काँग्रेसने म्हटलं आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी राजकीय दृष्टया तटस्थ असलं पाहिजे आणि आपल्या पदाच्या हिशोबाने आचरण केलं पाहिजे असं All India Services सेसचे नियम सांगतात. नियमांनी अधिकाऱ्यांना कुठल्याही राजकीय विचारधारेशी जोडण्यास मनाई केली आहे. आरएसएस सारख्या संघटनेच्या मंचावर जाऊन त्यांचं कौतुक करणं हे नियमांचं उल्लंघन नाहीय का? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

कायदा-सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम

हा मुद्दा फक्त एका अधिकाऱ्यापुरता मर्यादीत नाही. सिविल सर्विसेजची विश्वासहर्ता, राजकीय निष्पक्षतेचे संवैधानिक सिद्धांत आणि पोलीस प्रशासनावरील जनतेचा विश्वास याच्याशी संबंधित हे मुद्दे आहेत. सामाजिक विभाजनाला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनांचं उद्दातीकरण नव्हे, तर कायदा-सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे असं दुसऱ्या एका पोस्टमध्ये विरोधी पक्षाने म्हटलं आहे.

रविंदर सिंगल यांची जागा घेणार आहेत

महाराष्ट्र कॅडरचे सम्मानित IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची मंगळवारी नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. 26/11 चे हिरो म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. नांगरे पाटील हे रविंदर सिंगल यांची जागा घेणार आहेत. त्यांची बदली महाराष्ट्र अँटी-करप्शन ब्यूरोमध्ये एडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस पदावर झाली आहे. 1997 बॅचचे अधिकारी नांगरे पाटील, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी अतिरेक्यांचा मुकाबला करुन जे शौर्य दाखवलं होतं, त्यासाठी ओळखले जातात.

Follow Us
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार