AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात रेल्वे भरतीत फर्जीवाडा, नाव एकाचं पण परीक्षा देण्यासाठी दुसराच पोहोचला, असं फुटलं बिंग…

Nagpur Railway Recruitment Fraud : नागपुरात रेल्वेच्या परीक्षेत मुन्नाभाई प्रकारचा फर्जीवाडा उघडकीस आला आहे. दुसऱ्या उमेदवाराच्या नावावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवाराला अटक करण्यात आली आहे.

नागपुरात रेल्वे भरतीत फर्जीवाडा, नाव एकाचं पण परीक्षा देण्यासाठी दुसराच पोहोचला, असं फुटलं बिंग...
Nagpur Railway Recruitment FraudImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Sep 09, 2026 | 12:07 AM
Share

रेल्वे ग्रुप डी भरतीच्या शारीरिक पात्रता परीक्षेदरम्यान नागपुरात मुन्नाभाई प्रकारचा फर्जीवाडा उघडकीस आला आहे. दुसऱ्या उमेदवाराच्या नावावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या डमी उमेदवाराने संशय येताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजनी पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात घेतले. रेल्वे स्टेडियम मैदानावर शारीरिक पात्रता परीक्षा सुरू असताना हा प्रकार समोर आला.

रेल्वे भरतीत फर्जीवाडा

रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी राजेंद्रकुमार परदेशी यांना एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू असताना हा फर्जीवाडा उघडकीस आला. अंकित तिवारी या उमेदवाराचे नाव पुकारण्यात आले असता त्याऐवजी उपस्थित असलेला शिवम यादव अचानक पळू लागला. त्याने मैदानाची भिंत ओलांडून फरार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

कागदपत्रांची तपासणी आणि चौकशी केल्यानंतर शिवम यादव हा अंकित तिवारीच्या जागी शारीरिक पात्रता परीक्षा देण्यासाठी आल्याचे समोर आले. त्यामुळे रेल्वे भरती प्रक्रियेत बनावट उमेदवाराच्या माध्यमातून फर्जीवाडा करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले.

आणखी एका उमेदवाराच्या जागी परीक्षा दिल्याचा आरोप

दरम्यान, तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बुधाराम मीना याने राहुल मीना याच्या जागी परीक्षा दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे रेल्वे ग्रुप ‘डी’ भरतीच्या परीक्षेत एकापेक्षा अधिक ठिकाणी डमी उमेदवारांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अजनी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बनावट कागदपत्रे तयार करणे, त्यांचा वापर करणे आणि परीक्षा प्रक्रियेत फसवणूक करण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

रेल्वे भरतीसारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये उमेदवारांची ओळख आणि कागदपत्रांची काटेकोर तपासणी केली जात असतानाही डमी उमेदवारांच्या माध्यमातून फर्जीवाडा करण्याचा प्रयत्न झाल्याने या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर आरोपी आणि संपूर्ण फर्जीवाड्यामागील सूत्रधार कोण, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?