AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहाटे मोठा आवाज आला अन् एका क्षणात राखेचा ढिगारा, 17 जण होरपळले, नेमकं काय घडलं?

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील सोलर इंडस्ट्रीज (SBL) स्फोटक कारखान्यात भीषण स्फोट होऊन ५ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अनेक जण गंभीर जखमी असून बचावकार्य सुरू आहे.

पहाटे मोठा आवाज आला अन् एका क्षणात राखेचा ढिगारा, 17 जण होरपळले, नेमकं काय घडलं?
Nagpur blast
| Updated on: Mar 01, 2026 | 11:36 AM
Share

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर औद्योगिक वसाहतीत असलेल्या सोलर इंडस्ट्रीज (SBL) या स्फोटक तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 कामगारांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट भीषण असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

स्फोटाची तीव्रता प्रचंड; इमारत कोसळली

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या एसबीएल कंपनीत पहाटेच्या सुमारास हा स्फोट झाला. यावेळी या कारखान्यातील काम सुरू होते. त्याचवेळी अचानक हा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. तसेच या कारखान्याची मुख्य इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. यावेळी स्फोटामुळे कारखान्याचे अवशेष अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत उडाले. तसेच स्फोटानंतर इमारतीचा ढिगारा पडल्याने त्या ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या या कंपनीत झालेल्या स्फोटामुळे लागलेली आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच पोलीस, स्थानिक प्रशासन आणि कंपनीचे बचाव पथक ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर करत आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

दोषींवर कडक कारवाई करा, स्थानिकांची मागणी

या अपघातामुळे स्फोटक कारखान्यांमधील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कंपनी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि कामगारांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

दरम्यान या दुर्घटनेनंतर कंपनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कारखान्यांच्या सुरक्षिततेचे निकष पाळले जात आहेत की नाही, याची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. या भीषण घटनेमुळे पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...