Vidarbha Rain : गोंदियातील पुरात 3 युवक वाहून गेले, अकोल्यात पिकअप वाहन 50 फूट नदीत कोसळले, विदर्भातील पावसाची स्थिती काय?

| Updated on: Jul 13, 2022 | 5:36 PM

नेसत्या कपड्यानिशी लहान मुले व सामान घेऊन रहिवासी बाहेर निघाले आहेत. प्रशासनाने याबाबतीत मदत केली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

Vidarbha Rain : गोंदियातील पुरात 3 युवक वाहून गेले, अकोल्यात पिकअप वाहन 50 फूट नदीत कोसळले, विदर्भातील पावसाची स्थिती काय?
अकोल्यात पिकअप वाहन 50 फूट नदीत कोसळले
Image Credit source: t v 9
Follow us on

नागपूर : गोंदिया जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. गोंदिया तालुक्यातील तुमखेडा खुर्द (Tumkheda Khurd) येथील तीन युवक लोधीटोला येथील नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेले होते. त्यांचा तोल गेल्याने तीन युवक नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेले. तीन युवकांपैकी एका युवकाला वाचविण्यात आले आहे. दोघांचा शोध सुरू आहे. पुरात वाहून गेलेल्या युवकांचे नाव आशिष बागळे (Ashish Bagle) (24 वर्षे) व संजू बागळे (27 वर्ष) असे आहे. हे दोघेही भाऊ आहेत. तर सागर परतेकी (28 वर्षे) याला वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. दुसरीकडं अकोला जिल्ह्यात नदीच्या पुलाचे कठडे तोडून पीकअप वाहन 50 फूट खोल नदीत कोसळले. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. नदीच्या पुलावरून वाहन चालवताना अंदाज न आल्याने पिकअप वाहन तब्बल 50 फूट खोल नदीत कोसल्याची घटना घडली. यात अपघातात जिल्हातल्या केळीवेळी येथील सचिन मालठे (Sachin Malthe) व विशाल श्रीनाथ दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना गावकऱ्यांच्या मदतीने तत्काळ बाहेर काढण्यात आले आहे. अकोला सर्वोपचार रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.

इरई धरणाच्या विसर्गाने चंद्रपूर शहर जलमय

चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाचा विसर्ग सुरु झाल्याने शहरातील काही भाग जलमय झाले आहेत. नदीच्या काठावर असलेल्या नव्या वसाहतींना पुराचा मोठा फटका बसलाय. नदीत पाण्याची मोठी आवक झाल्याने राजनगर भागातील नव्या वसाहतीतील नागरिक घरे सोडण्यास बाध्य झाले आहेत. प्रशासनाने या सर्व नागरिकांना घरे रिकामी करण्याची सूचना दिली आहे. नेसत्या कपड्यानिशी लहान मुले व सामान घेऊन रहिवासी बाहेर निघाले आहेत. प्रशासनाने याबाबतीत मदत केली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

सिरोंच्यातील 11 गावांना रेड अलर्ट

गडचिरोली जिल्ह्यात दोन धरण आहेत. चिचोराह धरण 38 व लक्ष्मी धरणाचे 85 दरवाजे पूर्णपणे सोडण्यात आलेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. प्राणहिता व गोदावरी नदी धोका पातळीच्या वर वाहत आहे. तेलंगणा राज्यांतूनही वेनमपल्ली धरणाचे दरवाजे सोडण्यात आल्याने पाच लाख 20 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग त्या धरणात होत आहे. महाराष्ट्रात सीमावर्ती भागात वसलेल्या भामरागड एटापल्ली सिरोंचा या तालुक्यांना अलर्ट करण्यात आलेला आहे. सिरोंचा तालुक्यातील अकरा गावांना रेट अलर्ट घोषित करण्यात आले आहे. या भागात पोलीस व महसूल पथके रवाना करण्यात आलीत. सिरोंचा तालुक्यातील नगराम गावातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आहे.

हे सुद्धा वाचा