AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune rain : पावसाचे पाणी घुसले थेट पोलीस स्टेशनमध्ये! पाण्यातून वाट काढता काढता चंदननगर पोलिसांची तारांबळ

आज सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने साधारणपणे दुपारी बाराच्या दरम्यान तीन ते चार फूट पावसाचे पाणी पोलीस स्टेशन बाहेर आणि आतमध्ये साचले. अग्निशामक दलाचे जवान याठिकाणी नंतर दाखल झाले.

Pune rain : पावसाचे पाणी घुसले थेट पोलीस स्टेशनमध्ये! पाण्यातून वाट काढता काढता चंदननगर पोलिसांची तारांबळ
चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये घुसले पाणीImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jul 13, 2022 | 4:19 PM
Share

पुणे : पुण्यातील पावसाचे पाणी (Pune rain) आता थेट पोलीस स्टेशनमध्येदेखील घुसायला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याच्या घटना घडत असताना आता पोलीस स्टेशनचीही यात भर पडली आहे. चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये (Chandan nagar) सुरू असलेल्या पावसाचे पाणी घुसले आहे. त्यातच सकाळपासून पुन्हा शहरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. दुसरीकडे शहरातदेखील अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली आहे. सुरुवातीला हवाहवासा वाटणारा पाऊस आता पाणी साचण्याच्या घटनांमुळे त्रासदायक ठरत आहे. काही दिवस आता पावसाने उसंत घ्यावी, असे पुणेकर (Punekar) म्हणताना दिसून येत आहेत.

मागील वर्षीही घुसले होते पाणी

मुसळधार आणि संततधार पावसाच्या पाण्याचा खोलगट भागात घरे असणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तर पोलीस स्टेशनच्या आत पाणी शिरल्याने पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. नालेसफाईच्या नावानेदेखील आता नागरिक संतप्त होत आहे. प्रशासनाकडून नाले सफाई झाल्याचा दावा फोल ठरला असल्याचे या घटनांमधून दिसून येत आहे. गेल्या वर्षी रात्रीच्या वेळी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संगणक तसेच महत्त्वाच्या फाइल्स पाण्यामध्ये भिजल्या होत्या. तर रात्रभर टेबलावर बसून पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत होते.

chandan nagar 1

पोलीस स्टेशनच्या आतमध्ये पाणीच पाणी

पुन्हा मुसळधार!

आज सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने साधारणपणे दुपारी बाराच्या दरम्यान तीन ते चार फूट पावसाचे पाणी पोलीस स्टेशन बाहेर आणि आतमध्ये साचले. अग्निशामक दलाचे जवान याठिकाणी नंतर दाखल झाले. दोन मोटर पंपच्या सहाय्याने पाणी उपसण्यात असल्याचे पोलिस कर्मचाऱ्यांकडून नंतर सांगण्यात आले. दरम्यान, येत्या काही तासांत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. धरणांतून पाण्याचा विसर्ग होत असल्याने मुठा नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

घरांत घुसत आहे पाणी – पाहा व्हिडिओ

Follow Us
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं
पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
India Alliance Morcha : पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार,
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार, खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी दिली माहिती
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी अपडेट
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; थेट म्हणाले...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका