Abhijeet Dipke: वाह! अभिजीत दीपके नागपूरमधील विद्यार्थीनींच्या मदतीला धावला, थेट व्हिडीओ…
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी केलेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले. आता दीपके यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओपाहून सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

गजानन उमाटे, प्रतिनीधी: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीमधील जंतर मंतर येथे आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजिनामा झाला. या आंदोलनानंतर अभिजीत दीपके विद्यार्थ्यांच्या समस्या मांडताना दिसत आहे. तसेच देशभरातील विद्यार्थी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या समस्या सांगताना दिसत आहेत. नुकताच अभिजीत दीपके यांनी नागपूर जिल्ह्यातील ‘टीना’ आणि तिच्या मैत्रिणींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विद्यार्थीनींनी शाळेत जाण्यासाठी बसची मागणी केली आहे.
काय आहे व्हिडीओ?
शालेय विद्यार्थिनींची समस्या सांगणारा नागपूर जिल्ह्यातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विद्यार्थीनी बोलताना दिसत आहेत की, “आम्हाला आमच्या गावापासून शाळेपर्यंत एसटी सुरु करुन हवी आहे. आमच्या गावापासून आमची शाळा सात किलो मीटर अंतरावर आहे. आम्हाला शाळेत जाताना त्रास होतो. आमच्या गावचा रस्ता खराब आहे. आम्ही सायकलने जात असल्यामुळे सायकलचे चाक पंक्चर होते. आम्हाला वारंवार समस्या येत आहेत. आम्ही पाण्यापावसात चालत जातो. म्हणून आम्हाला आमच्या गावात बस सेवा सुरु करुन द्यावी, आमच्या रस्ता ठिक करुन द्यावा ही आमची मागणी आहे.”
वाचा: अभिजीत दीपके मोठ्या अडचणीत! POCSO अंतर्गत तक्रार दाखल? इन्फ्लुएन्सरचे चौकशीची मागणी
Students are demanding bus transport because their school is 7 km away.
When simply reaching school becomes a daily hardship, what hope are we giving these children for their future? pic.twitter.com/IDkhZxeIRt
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) August 12, 2026
रस्ता सुधारावा ही मागणी
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्याच्या खेतापूर गावातील विद्यार्थिनींची हा व्हिडीओ. गावापासून शाळेत जायला बस किंवा इतर साधने नाहीत. त्यामुळे शाळेपर्यंतचा सात किलोमीटरचा प्रवास या शालेय विद्यार्थ्यांना सायकलद्वारे करावा लागत आहे. प्रशासनाने गावापासून शाळेत जाण्यासाठी एसटी बसची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि रस्ता सुधारावा अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे.
खेतापूर गावातील विद्यार्थी रोज डोंगरगाव आणि नागपूरला शिक्षणासाठी जातात. पण बसची व्यवस्था नसल्याने त्यांना रोज पाण्या पावसात सायकलने सात किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. उद्यापासून बस सुरु होणार, असं या विद्यार्थिनींनी सांगीतलं