AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrasekhar Bavankule | ऊर्जा मंत्रालयाच्या खासगीकरणाचा प्रयत्न; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप, विदर्भात 18, मराठवाड्यात 11 प्रकल्प जलविद्युत प्रकल्प?  

राज्याचे ऊर्जा मंत्रालय 78 जलविद्युत प्रकल्पांच्या माध्यमातून महाजेनकोचे खासगीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. सरकार हे जाणीवपूर्वक करीत आहे. त्यामागे कमिशनखोरीचा गंध येत असल्याचा संशय राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.  

Chandrasekhar Bavankule | ऊर्जा मंत्रालयाच्या खासगीकरणाचा प्रयत्न; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप, विदर्भात 18, मराठवाड्यात 11 प्रकल्प जलविद्युत प्रकल्प?  
राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे Image Credit source: facebook
| Updated on: Apr 25, 2022 | 6:02 PM
Share

नागपूर : आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंपर्क कार्यालयात (Public Relations Office) सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्यातील विद्यमान सरकार ऊर्जा निर्मिती (Minister of Energy) क्षेत्रातील खासगी कंपन्यांचा सहभाग जाणीवपूर्वक वाढवित आहे. एकीकडे आंदोलन करणाऱ्या कर्मचारी संघटनांना ऊर्जा मंत्र्यांनी महावितरणचे खासगीकरण होणार नसल्याचे आश्वासन दिले. पण, दुसरीकडे जलविद्युत क्षेत्रातील छोटे वीज निर्मिती प्रकल्प (Power Generation Project) उभारण्यासाठी राज्यातील 78 जागा निश्चित करण्यात येत आहेत. जलविद्युत क्षेत्रातील खासगी प्रकल्पांना प्राधान्य देऊन भ्रष्टाचाराचे मार्ग खुले करण्याचा हा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.

विदर्भात 18, मराठवाड्यात 11 प्रकल्प

महाविकास आघाडीचे सरकार 25 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेचे विद्युत प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी यासंदर्भातले परिपत्रकही जारी केले होते. पण कर्मचारी संघटनांच्या वाढता दबाव आहे. त्यामुळं त्यांना निर्णय मागे घ्यावा लागल्याच्या गौप्यस्फोट आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. एकूण 307 मेगावॅट क्षमतेच्या या 78 प्रकल्पात विदर्भात 18, मराठवाड्यात 11, उत्तर महाराष्ट्रात 7, पश्चिम महाराष्ट्रात 7 आणि कोकणात 25 प्रकल्प निर्माण करण्यासाठी जागेच्या निश्चितीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. हा सगळा खटाटोप केवळ भ्रष्टाचाराचे मार्ग खुले करण्यासाठीच असल्याचंही ते म्हणाले.

वीज संचांची दुरुस्ती महत्वाची

राज्याचे ऊर्जा मंत्रालय 78 जलविद्युत प्रकल्पांच्या माध्यमातून महाजेनकोचे खासगीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. सरकार हे जाणीवपूर्वक करीत आहे. त्यामागे कमिशनखोरीचा गंध येत असल्याचा संशय राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.  आजच्या घडीला महाराष्ट्रात 2300 मेगावॅट वीज निर्मिती करणारे महत्वाचे 7 संच देखभाल दुरुस्तीच्या नावावर बंद आहेत. मुळात विजेची मागणी कमी असताना या संचाची दुरुस्ती गरजेची होती. पण आता ऐन उन्हाळ्यात संच बंद ठेवून राज्यात विजेचे संकट भासवायचे. ते नियंत्रणात आणण्यासाठी हायड्रो प्लांटच्या माध्यमातून खासगीकरणाचे मार्ग खुले करण्याचा प्रयत्न ऊर्जा मंत्रालयाचा असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. वास्तविकपणे खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची सध्या गरज आहे. महावितरण विभाग सक्षम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Buldana Market | महागाई आणि चारा टंचाईमुळे जनावरे विक्रीस, खामगाव बाजारात कवडीमोल भाव

Video Wardha Fire | वर्ध्यातील गादी कारखान्याला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान; काटोलमधील आगीत वृद्ध ठार

Gadchiroli Crime | अहेरीत जवानाने गोळ्या झाडून स्वत:ला संपविले; माजी पालकमंत्र्यांच्या घरासमोरील घटनेने खळबळ

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.