AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राणी असलेले पिंजरे धोकादायक स्थितीत, पर्यटकांचा जीव धोक्यात ?

यापुर्वी महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्यातून प्राणी बाहेर आल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवानं यात कसल्याची प्रकारची हानी झाली नाही. पुन्हा तशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं वेळीच आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.

महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राणी असलेले पिंजरे धोकादायक स्थितीत, पर्यटकांचा जीव धोक्यात ?
maharaj-baugImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 25, 2023 | 11:48 AM
Share

गजानन उमाटे, नागपूर : नागपुरातील (Nagpur) 130 वर्षे जुन्या महाराजबाग (maharajbag) प्राणिसंग्रहालयातील पिंजरे खिळखिळे झाले आहे. या प्राणिसंग्रहालयातील प्राणी असलेले पिंजरे धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळं याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात आलाय. नागपुरातील महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला 130 वर्षे पूर्ण झाले आहे. विदर्भातील आकर्षणाचं केंद्र असलेले हे प्राणीसंग्रहालयातील पिंजरे मात्र आता खिळखिळे झाल्याचे पाहायला मिळत आहे. निधी अभावी या प्राणीसंग्रहालय (zoological museum) विकास खुंटल्याची माहिती मिळाली आहे.

प्राणिसंग्रहालयातील प्राणी असलेले पिंजरे गंजले

सध्या नागपूरमधील महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राणी असलेले पिंजरे गंजले आहेत. काही ठिकाणी तुटले आहेत, त्याचबरोबर धोकादायक स्थितीत आहे. नव्या नियमानुसार प्राणी असलेल्या ठिकाणी पिंजरे न करता खंदक करणे आवश्यक आहे. यासाठी महाराजबाग प्रशासनाने सरकारकडे 84 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही, त्यामुळं प्राणिसंग्रहालयाची स्थिती अधिक वाईट आहे अशी माहिती महाराजबाग प्राणिसंग्रहालय, व्यवस्थापक, सुनील बावस्कर यांनी दिली.

वेळीच आवश्यक उपाययोजना करण्याची गरज

यापुर्वी महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्यातून प्राणी बाहेर आल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवानं यात कसल्याची प्रकारची हानी झाली नाही. पुन्हा तशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं वेळीच आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. पाहायला येणाऱ्या पर्यटकांना काही सुचना द्याव्या लागत आहेत.  त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी प्राणी संग्रहालयात मोठी गर्दी असते.

नागपूरात प्राणी संग्रहालयात अनेक प्राणी आहेत.  मागच्या 130 वर्षांपासून तिथं लोकांची गर्दी असते. त्याचबरोबर परदेशातील सुध्दा पर्यटक तिथं भेट देत असतात. इतक्या जुन्या प्राणी संग्रहालयात पिंजऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. पर्यटक पाहायला आल्यानंतर एखादा प्राणी अचानक बाहेर आल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यवस्थापकांनी बोलून दाखवली आहे.

Follow Us
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?