संघाच्या प्रमुख पदी महिला बसू शकते का? काँग्रेसच्या या बड्या नेत्याने नाडीच आवळली, पंतप्रधानांचे नाव घेत…
Vijay Vadettiwar On RSS And BJP: देशात महिला आरक्षण बिलावरून राजकारण तापलेच नाही तर चांगलेच पेटले आहे. विरोधकांच्या अभूतपूर्व एकजुटीचीही जोरदार चर्चा सुरू आहे. या घटनादुरुस्ती विधेयकावरून काँग्रेसने सरकारला कोंडीत पकडल्याचा दावा करण्यात येत असतानाच आता भाजपवर हल्लाबोल करण्यात येत आहे. महिला आरक्षणावरून संघाला या वादात ओढण्यात आले आहे.

Vijay Vadettiwar On RSS And BJP: महिला आरक्षण बिलावरून देशात रणकंदन सुरू आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक धुमश्चक्री सुरू आहे. विरोधकांच्या एकजुटीने सरकारला मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर तिखट हल्ला केल्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातून तोफ धडाडली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आणि महायुतीत किती महिला आहेत, असा सवाल विचारून कोंडी केली असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला चांगलेच डिवचले आहे. या वादात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही ओढण्यात आले आहे.
संघाच्या प्रमुख पदी महिला बसू शकते का?
पाच राज्यातील निवडणुका सुरू असताना आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आलं. कालचं पंतप्रधान भाषण नव्हतं तर राजकीय नेत्याचं भाषण होतं. मोदींना 50 वेळा काँग्रेसचं नाव का घ्यावं लागतं. एवढी काँग्रेसची का भीती वाटते आहे? परकियांना देशावर आक्रमण केलं तेव्हा शिवाजी महाराजांचे मावळे तयार झाले. त्यांची परकियांना जशी भीती वाटत होती तशीच भीती काँग्रेसची देशाच्या पंतप्रधान वाटत आहे. काँग्रेसने देशाच्या महिलांचा सन्मान केला. पहिला महिला पंतप्रधान आणि राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष काँग्रेसने दिले. संघाच्या प्रमुख पदी महिला बसू शकते का? असा खडा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
मनुवादी विचारसरणी आणि मनुस्मृती जपणारे भाजपा महिलांच्या आरक्षणाबाबत किती बनवाबनवी करत आहे. हे लोकांना कळून चुकलंय. 2023 मध्ये महिला आरक्षण बिल मंजूर झाल्यावर सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. बिल मंजूर झाल्यावर पुन्हा परिशीमानाच्या नावावर दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असे लपून राहिले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी आरक्षण काँग्रेसने आणले. महिला आरक्षणाच्या आड घटना दुरूस्ती करून आपल्या मर्जीने मतदार संघ तयार करणे हा यामागचा छुपा अजेंडा आहे, अशी टीका त्यांनी केली.
ते तर मगरीचे अश्रू
आसाममध्ये भाजप सरकारने मतदार संघाचे इकडचे तुकडे तिकडे करून आपल्या सोयीने विभागणी केली आहे. काल पंतप्रधान बोलले हे मगरीच्या डोळ्यातील अश्रू होते. महिलांवरील अत्याचाराची यादी काढली तर जवळपास 20 लोक भाजपामध्ये आहे. त्यांच्यावर कारवाई होत नाही. ह्यांना महिलांचा सन्मान नाही. यांनी कितीही बोंबलले. तरी यांना कोणी दाद देणार नाही. चार महिला गोळा करून काँग्रेसला महिला विरोधी दाखवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही. काँग्रेसचा ज्वजल्य इतिहास देशातील महिलेपुढे आहे. महिला आरक्षणाचा विषय तीन दशकापासून सुरू आहे. मनमोहन सिंग आणि इतर सरकार असताना याला विरोध करणारे कोण होते? असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.
नवनीत राणा विषवल्ली
नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली आहे, अशी जहरी टीका वडेट्टीवार यांनी केला. जात आणि धर्मात भांडण लावून सत्तेची पोळी कशी शेकता येईल. यासाठी पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली आहे. महिलांवरील अत्याचारा संदर्भात तिथे जात आणि धर्म कुठे येतो? जो असेल तो नालायक आणि हरामखोर असतो त्याला फाशी झाली पाहिजे. तिथे बुरख्यावाले नव्हते असं नवनीत राणा कोणत्या आधारावर बोलल्या. तोंडात आलं की काहीपण वाफा काढायचं का? या बाईची जीभ जातीयवादी आणि धर्मांध बनली आहे. लोकांनी निवडणुकीत पाडून जिरवल तरी अजून शुद्धीवर यायला तयार नाही. राणा यांना हनुमान चालीसाच्या दोन ओळी बोलता येत नाही ते हिंदू धर्माच्या गोष्टी बोलत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
खरात प्रकरणावर ब्र न काढणारी बाई. मुस्लिम तरुण दिसल्याबरोबर बावचाळल्यासारखी बोलते. हे अत्यंत घृणास्पद आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. खासदार अनिल बोंडे डॉक्टर आहेत. डॉक्टरांनी पेशंटला कुणाचं रक्त लावावं हे धर्म पाहून लावलं जात नाही. त्या डॉक्टरांची भूमिका निषेधार्य आहे. भाजपचे पुरस्कृत भोंदू तयार झाले आहे. धर्माधर्मात वाद लावणारी धर्मांत शक्ती वाढत चालली आहे. यांना पोचले जात असल्याने ही संख्या वाढत आहे. आणि महिला अत्याचारात वाढ होत आहे असा स्पष्ट आरोप आहे, अशी टीका वडेट्टीवारांनी केली.
राणा आणि बोंडेंवर कारवाई करा
नवनीत राणा यांनी धर्मांध पसरविण्याचा आणि दोन धर्मात तेढ पसरविण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक व्हायला पाहिजे. आणि अनिल बोंडे यांनी चुकीची माहिती पसरवली म्हणून त्यांच्यावरील व्हायला पाहिजे अशी मागणी वडेट्टीवारांनी केली.
दादांच्या विमान अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करा
अजित दादांचा विमान अपघात संशयाचा भवरा निर्माण करणारा अपघात आहे या अपघाता संदर्भात संभ्रम कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एखादा गुन्हा दाखल व्हायला नको का ? परंतु सरकार गुन्हा दाखल करायला तयार नाही. केवळ निवेदन स्वीकारून चालणार नाही. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा थंड बसल्यात पडेल. सध्या 150 एसआयटी महाराष्ट्रात सुरू आहे. ते सर्व थंड बसत्यात आहे तसंच या प्रकरणात होईल. महाराष्ट्रातील मजबूत नेता गेलेला असताना त्याचा साधा एफआयआर होत नाही, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला.