Video – Nagpur MLC | चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय, आघाडीची मतं फुटली, छोटू भोयर यांना फक्त एक मत

नागपूरवरून भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला. बावनकुळे यांना 362 मतं मिळाली आहेत. बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.

Video - Nagpur MLC | चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय, आघाडीची मतं फुटली, छोटू भोयर यांना फक्त एक मत
चंद्रशेखर बावनकुळे
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 9:58 AM

नागपूर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नागपूरच्या जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला. महाविकास आघाडीची मतं फुटली. छोटू भोयर यांना फक्त एक मत मिळालं. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांना 186 मतं मिळाली आहेत. तर, चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.

बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला

चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे. त्यामुळं ते विजयी झाले आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आठ वाजता सुरू झाली. मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झाली. या निवडणुकीत 10 डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान झाले. मतदानाची टक्केवारी 98.93 टक्के इतकी होती. यात 283 महिला आणि 271 पुरुष मतदारांचा समावेश होता. एकूण 560 पैकी 554 मतदारांनी मताधिकार बजावला होता.

महाविकास आघाडीत नव्हते एकमत

उमेदवारी देताना काँग्रेसमध्ये एकमत नव्हतं. सुरुवातीला राजेंद्र मुळक यांचं नाव समोर करण्यात आलं. परंतु, त्यानंतर संघाचा स्वयंसेवक आयात करण्यात आला. नाना पटोले यांनी छोटू भोयर यांना आयात केलं. पण, ऐन प्रचाराच्या वेळेत भोयर कमी पडले, असा आरोप सुनील केदार यांनी केला. त्यामुळं सुनील केदार यांनी पुढाकार घेऊन उमेदवार वेळेवर बदलविला. अपक्ष मंगेश भोयर यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला. राष्ट्रवादीची सुरुवातीपासूनच नाराजी होती. आम्हाला उमेदवारी अर्ज करताना बोलावलं नाही, असं राष्ट्रवादीचे नेते म्हणाले होते. शिवसेनाही मनातून काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागं नव्हती. या साऱ्यांचा फटका महाविकास आघाडीला बसला.

महापालिकेत भाजपला फायदा होणार

येत्या महापालिका निवडणुकीवर या निवडणुकीचा परिणाम होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला याचा फटका बसेल असं चित्र आहे. भाजपचे नगरसेवक एकत्र आले. त्यांनी बावनकुळे यांना निवडूण दिले. आता बावनकुळे यांनी नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घातलं तर याचा नक्कीच भाजपला फायदा होणार आहे.

Nagpur MLC Election Result 2021: भाजपचं प्लॅनिंग यशस्वी, नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे विजयी

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका नको, नाना पटोलेंकडून भूमिका स्पष्ट, उद्याच्या सुनावणीकडे लक्ष

शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.