AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीआर निघाला तरी मदत कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी अखेर थेटच सांगितलं; धक्का की दिलासा?

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याचा जीआर निघणार असला तरी, शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष आर्थिक मदतीसाठी दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकार मदत करत असले तरी, ही घोषणा शेतकऱ्यांसाठी दिलासा की आणखी प्रतीक्षा, यावर चर्चा सुरू आहे.

जीआर निघाला तरी मदत कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी अखेर थेटच सांगितलं; धक्का की दिलासा?
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2026 | 5:13 PM
Share

राज्यात प्रचंड दुष्काळ पडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. शनिवारी कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी अजून प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसापासून दुष्काळी भागाची पाहणी करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल लातूर आणि धाराशिव आदी भागाची पाहणी केली. आज सकाळी वाशिममधील दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर फडणवीस अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दिवाळीपूर्वीच आम्ही शेतकऱ्यांना मदत करू, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

उद्या दुष्काळ जाहीर करू

शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांची पिके वाया गेली आहेत. त्यामुळे त्यांना काय दिलासा द्यायचा याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. दुष्काळाच्या कायद्यानुसार ट्रिगर एक प्रमाणे पहिल्या काही भागात दुष्काळ जाहीर करायचा शासन आदेश आहे. तो उद्या आम्ही जाहीर करू. त्याचा जीआर आम्ही काढणार आहोत. जर एखादा भाग सुटला तर ट्रिगर तीन नुसार त्याला त्यात घेऊ. ज्या भागात दुष्काळ दिसतोय, तो भाग दुष्काळी म्हणून जाहीर करू, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

हेक्टरीही मदत करू

शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करावी लागणार आहे. चारा टंचाई, पाण्याची टंचाई यासंदर्भात आपण कार्यवाही करणार आहोत. अन्नधान्याची कमतरता पूर्ण करणार आहोत. त्याचं व्यवस्थापन करणार आहोत. हेक्टरी मदतही करणार आहोत. मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये त्यासाठी ज्या काही उपाययोजना करायचे आहे त्या करू. ज्या भागात रब्बीचा पेरा करता येईल, त्या भागात देखील मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं त्यांनी यांनी स्पष्ट केलं.

कर्जमाफीचे पैसे जमा होत आहेत

आपण आजपर्यंत केंद्राच्या पैशासाठी थांबलो नाही. आपण आपल्या भरवश्यावर मदत करत आहोत. केंद्र देखील भरघोस मदत करेल, याबद्दल शंका नाही. कर्जमाफीचे पैसे मोठ्या प्रमाणावर जमा होत आहेत. वाशिम जिल्ह्यात 52 हजार पैकी 42 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जाणार आहेत, असं ते म्हणाले.

आधी भूतकाळात पाहा

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. काही लोक दुष्काळावर बोलत आहेत. त्यांनी थोडं भूतकाळातही डोकावून पाहिलं पाहिजे. त्यांच्या काळामध्ये त्यांनी काय निर्णय केले? त्याला किती वेळ लागला? त्यांनी कशा पद्धतीने मदत केली? त्यांनी मागे वळून बघितलं तर त्यांच्या लक्षात येईल, त्यांच्यापेक्षा आम्ही चांगलं काम आम्ही करत आहोत. मागणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्यावर मी टीका करणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

सोयाबीन खरेदी करू

सगळी सोयाबीन खरेदी करावी लागली तर आम्ही खरेदी करू. पण यावर्षी शासकीय दरापेक्षा खासगी बाजारात सोयाबीनला दर जास्त राहण्याची शक्यता आहे. सोयाबीनची नोंदणी लवकर सुरू करू, असं सांगतनाच आम्ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत करू, असं त्यांनी जाहीर केलं.

Follow Us
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश