Arun Lakhani: महात्मा गांधींशी पंतप्रधान मोदींची तुलना? सुप्रिया सुळेंचे व्याही हे काय बोलून गेले… भाजप नेते अरुण लखाणी म्हणाले की…

Arun Lakhani on PM Modi And Mahatma Gandhi: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात येत असतानाच आता महात्मा गांधी यांच्याशीही त्यांची तुलना करण्यात येत आहे. काय म्हणाले उद्योजक आणि भाजप नेते अरूण लखाणी?

Arun Lakhani: महात्मा गांधींशी पंतप्रधान मोदींची तुलना? सुप्रिया सुळेंचे व्याही हे काय बोलून गेले... भाजप नेते अरुण लखाणी म्हणाले की...
महात्मा गांधी, पंडित नेहरू, अरूण लखाणी
Image Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: Jun 12, 2026 | 10:31 AM

Arun Lakhani on PM Modi And Mahatma Gandhi: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीची तुलना करण्यात येत आहे. पंतप्रधान पदाचा कार्यकाळाचा विक्रम केल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान नेहरू यांची कुणाशी तुलना होऊ शकत नाही असे परवा म्हटले. तर खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही उद्योजक आणि विधान परिषदेचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार अरुण लखाणी यांनी मात्र महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली आहे. त्यावरून नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले भाजप नेते अरुण लखाणी?

महात्मा गांधी आवाहन करायचे आणि संपूर्ण देश उपवास करायचा. त्या प्रकारची क्षमता आणि आदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केलं आणि लोकांनी काटकसर सुरू केली. लोक आता इंधन कमी वापरायला लागले. पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केलं आणि आमच्या घरातून विनंती आली की रेवती आणि सारंगचं रिसेप्शन पुढे ढकलू शकतो का? त्यामुळे आम्ही २७ नोव्हेंबरचं रिसेप्शन १६ डिसेंबर ला पुढे ढकललं आहे. आम्ही सारंग आणि रेवती यांचं रिसेप्शन पुढे ढकललं. रिपिसेप्शन पुढे ढकललं, पत्रिकाही छापल्या होत्या. वाटल्या होत्या. काही गोंधळ झाला. पण लग्न वेळेवर होणार आहे. लग्नात कोण येणार, हे २० तारखेला कळेल. सर्वांना पत्रिका दिल्याय.सुप्रिया ताई डिसेंबरमध्ये दिल्लीला रिसेप्शन देणार आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येणार आहे, अशी माहिती लखाणी यांनी दिली.

मोदीजींचा १२ वर्षे सुवर्णकाळ

तर भाजप नेते अरुणी लखाणी यांनी मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांतील कारकीर्दीचा उल्लेख केला. मोदीजींचा १२ वर्षांचा कालावधी हा सुवर्णकाळ आहे. भारताचा विकास झाला. जगात भारताला आदर मिळायला लागला. महिला आणि गरिबांसाठी आलेल्या योजना क्रांतीकारी आहेत. काल विजयाचं प्रमाणपत्र घेतलं. त्यावेळी सर्व आमदार उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्यातील एका नगरपालिकेला आदर्श नगरपालिका करणार आहे. काँग्रेसकडे बहुमत नव्हतं, त्यामुळे त्यांनी ही निवडणूक लढून फायदा नव्हता. महायुतीची ताकद आहे. विजयाची आशा नव्हती म्हणून त्यांनी माघार घेतली असे भाजप नेते लखाणी म्हणाले.

राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरणावर काय प्रतिक्रिया?

राष्ट्रवादी शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होणार असल्याच्या प्रश्नावर त्यांनी बोलणे टाळले. मी राजकारणात नवीन आहे. जे अनेक वर्षे राजकारणात आहे. त्यांनाही या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा प्रश्न अवघड असल्याचे सांगत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.

Follow Us