AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP ला आणखी एक मोठं यश, आंदोलनाचा इशारा देताच सगळे गुन्हे मागे; नेमका निर्णय काय?

अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीला आणखी एक मोठे यश मिळाले. नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करताना बिहारमध्ये अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र आता बिहार पोलिसांनी हे गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे.

CJP ला आणखी एक मोठं यश, आंदोलनाचा इशारा देताच सगळे गुन्हे मागे; नेमका निर्णय काय?
Bihar Protest UpdateImage Credit source: Google
| Updated on: Jul 27, 2026 | 9:58 PM
Share

अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीला आणखी एक मोठे यश मिळाले. नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करताना बिहारमध्ये अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र आता बिहार पोलिसांनी हे गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना लवकरच सोडले जाणार आहे. आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत कॉकरोच जनता पार्टीने आंदोलकांवरी गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता बिहार सरकारने हे गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे.

गुन्हे मागे घेतले जाणार

नीट-यूजी परीक्षेतील पेपरफुटीनंतर बिहारमधील अनेक भागांत विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले होते आणि काही जणांना ताब्यातही घेतले होते. आता राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, निश्चित काळापर्यंत झालेल्या आंदोलनांबाबत प्रशासनाने नरम भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता आंदोलकांनवरील गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बिहार सरकारच्या चार मोठ्या घोषणा

  • 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बिहारमध्ये झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही व्यक्तीविरोधात दंडात्मक, सूडभावनेतून किंवा प्रतिकूल कायदेशीर कारवाई केली जाणार नाही.
  • 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपूर्वी नोंदविण्यात आलेले सर्व एफआयआर, तक्रारी आणि बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसा मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार आहे.
  • निश्चित कालमर्यादेपूर्वी दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये अटक किंवा ताब्यात घेतलेल्या सर्व विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांची शक्य तितक्या लवकर सुटका करण्यात येणार आहे.
  • 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपूर्वी दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये नामनिर्देशित व्यक्तींविरोधात भविष्यातही या प्रकरणांच्या संदर्भात कोणतीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कारवाई केली जाणार नाही.

तेजस्वी यादव यांनी सरकारला दिला होता अल्टिमेटम

तेजस्वी यादव यांनी सरकारला 27 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुदत दिली होती. यादव यांनी इशारा दिला होता की, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील सर्व एफआयआर आणि गुन्हे मागे घेतले नाहीत, तर बिहारमध्ये मोठे आंदोलन छेडले जाईल. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले होते. आता बिहार सरकारने गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला