AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नसीरुद्दीन शाहचा मुलीच्या वयापेक्षा लहान असणाऱ्या अभिनेत्रीसोबत रोमान्स, गाणं ठरलेलं सुपरहिट, आजही चाहते…

1989 मध्ये नसीरुद्दीन शाहने आपल्या मुलीच्या वयापेक्षा देखील लहान असणाऱ्या अभिनेत्रीसोबत केला होता रोमान्स. चित्रपटातील गाणं ठरलेलं प्रचंड सुपरहिट, आजही लोक वेळ काढून ऐकतात.

नसीरुद्दीन शाहचा मुलीच्या वयापेक्षा लहान असणाऱ्या अभिनेत्रीसोबत रोमान्स, गाणं ठरलेलं सुपरहिट, आजही चाहते...
| Updated on: Oct 27, 2026 | 2:18 PM
Share

1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘त्रिदेव’ या गाजलेल्या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि अभिनेत्री सोनम खान यांची जोडी झळकली होती. दोघांच्या वयातील मोठ्या अंतरामुळे या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत नसीरुद्दीन शाह यांनी सुरुवातीला आक्षेप घेतला होता. आता अनेक वर्षांनंतर चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव राय यांनी या घटनेमागील किस्सा सांगितला आहे.

राजीव राय यांनी विक्की ललवानी यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘त्रिदेव’ चित्रपटाच्या स्क्रिप्टवर चर्चा करताना नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या पहिल्या लग्नातील मुलगी सोनम खानपेक्षाही मोठी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सोनमसोबत रोमँटिक भूमिका साकारण्याबाबत त्यांना संकोच वाटत होता.

यावर राजीव राय यांनी त्यांना समजावले की, चित्रपटातील जोडी म्हणून दोघेही योग्य दिसत आहेत. हा चित्रपट आहे, वास्तववादी माहितीपट नाही, असे सांगत त्यांनी वयातील अंतराकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. नसीरुद्दीन शाह यांनी मात्र आपण केवळ आपले कर्तव्य पार पाडत असून वस्तुस्थिती सांगत असल्याचे स्पष्ट केले. दिग्दर्शकांनी त्यांना अत्यंत प्रामाणिक व्यक्ती असेही म्हटले.

सोनम खान यांनीही दिली होती संमती

नसीरुद्दीन शाह यांची भूमिका ऐकल्यानंतर राजीव राय यांनी सोनम खान यांच्याशीही या विषयावर चर्चा केली. त्यांनी सोनम यांना या जोडीसोबत काम करण्यास योग्य वाटेल का, असे विचारले होते.

त्यावर सोनम खान यांनी नसीरुद्दीन शाह यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत काम करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे सांगितले. तसेच, आपली कास्टिंग बदलू नये, अशी विनंतीही त्यांनी दिग्दर्शकांना केली होती.

‘त्रिदेव’ ठरला होता ब्लॉकबस्टर

राजीव राय दिग्दर्शित आणि गुलशन राय निर्मित ‘त्रिदेव’ हा चित्रपट 1989 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि सोनम खान यांच्यासह सनी देओल, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित, संगीता बिजलानी आणि अमरीश पुरी यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

चित्रपटातील ‘तिरछी टोपीवाले’ हे गाणेही विशेष चर्चेत आले होते. वयातील अंतर आणि कास्टिंगबाबत सुरुवातीला प्रश्न उपस्थित झाले असले तरी ‘त्रिदेव’ बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्याची गणना झाली.

Follow Us
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या..
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या नासाडीचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील
Breaking Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील किरण सरनाईक आघाडीवर
मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका....
Marathwada MLC Election Result 2026 : मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका, गठ्ठे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी...
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी कोर्टाची थेट कारवाई
84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
Nagpur MLC Election Result : नागपूर पदवीधर मतमोजणी सुरू; 84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणीवरून भाजप नेत्याचं मोठं विधान
MLC Election 2026 Result Updates : शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणी प्रक्रियेवरून भाजप नेत्याचं मोठं विधान, थेट म्हणाले...
प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या.
Amravati MLC Election 2026 Result: प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत काय घडतंय?
नागपूर पदवीधर निवडणुकीत 34 पोस्टल मतं बाद; निकालाच्या गणितावर काय....
Nagpur MLC Election 2026 Result : नागपूर पदवीधर निवडणुकीत 34 पोस्टल मतं बाद; निकालाच्या गणितावर काय परिणाम होणार?
एकूण सहा फेऱ्यांनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार
Maharashtra MLC Election 2026 Result : एकूण सहा फेऱ्यांनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार
शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात....
Shivsena : शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी