Congress : ईडीविरोधातील आंदोलनाला दांडी, काँग्रेसच्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यांची यादी तयार; हायकमांड कारवाई करणार?

| Updated on: Jun 16, 2022 | 8:31 AM

Congress : ईडी विरोधात नागपूरात झालेल्या आंदोलनात सहभागी न झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची यादी तयार करण्याचं काम सुरु आहे. या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची यादी प्रदेश काँग्रेस आणि त्यानंतर दिल्लीत पाठवली जाणार आहे.

Congress : ईडीविरोधातील आंदोलनाला दांडी, काँग्रेसच्या त्या पदाधिकाऱ्यांची यादी तयार; हायकमांड कारवाई करणार?
ईडीविरोधातील आंदोलनाला दांडी, काँग्रेसच्या 'त्या' पदाधिकाऱ्यांची यादी तयार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर: काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांची सलग तीन दिवस ईडीकडून (ED) चौकशी करण्यात आली आहे. अजूनही त्यांना ईडीने चौकशीला बोलावलं आहे. त्यामुळे काँग्रेस (congress) कार्यकर्ते संतापले आहेत. राहुल गांधी यांच्या चौकशीच्या पहिल्या दिवसापासूनच देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड आंदोलन केलं. या आंदोलनात काँग्रेसचे देशभरातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते. यावेळी जेलभरो आंदोलनही करण्यात आलं. नागपुरातही काँग्रेसने जोरदार आंदोलन केलं होतं. पण या आंदोलनाला नागपूरच्या काही पदाधिकाऱ्यांनी दांड्या मारल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या दांडीबहाद्दर पदाधिकाऱ्यांची यादी तयार केली जात असून ही यादी दिल्लीत हायकमांडला पाठवली जाणार आहे. त्यामुळे हायकमांड या पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ईडी विरोधात नागपूरात झालेल्या आंदोलनात सहभागी न झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची यादी तयार करण्याचं काम सुरु आहे. या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची यादी प्रदेश काँग्रेस आणि त्यानंतर दिल्लीत पाठवली जाणार आहे. त्यामुळे गैरहजर राहणाऱ्या या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची यादी तयार होत असलेल्या अनेकांची धाकदूक वाढली आहे. राहूल गांधी यांची ईडीने चौकशी केल्यामुळे नागपूरात सोमवारी काँग्रेसने आंदोलन केलं होतं. या आंदोलनात विदर्भातील सर्वच काँग्रेस पदाधिकाऱ्यांना येण्याच्या सूचना होत्या. तरीही अनेक काँग्रेस पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यानुसार या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची यादी तयार केली जातेय. नागपूरातील पदाधिकाऱ्यांची यादी तयार होत असल्याची माहिती नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी दिलीय. ही यादी दिल्लीतून मागवण्यात आल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

नाना पटोले कारवाई करणार?

ईडी विरोधातील आंदोलनात सहभागी न होणाऱ्या या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. ही यादी आधी प्रदेश काँग्रेसकडे पाठवली जाईल. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार की वेट अँड वॉचची भूमिका घेतली जाणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राहुल गांधींची चौकशी सुरूच

नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीने सलग तीन दिवस चौकशी केली. तब्बल 8-8 तास राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांना पुन्हा एकदा चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. सूड भावनेने ही चौकशी होत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशातील प्रत्येक राज्यात जोरदार आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला आहे.