Video – Mission Magar : नाग नदीत दिसली मगर, वनविभागाचा महिनाभर शोध; अखेर कशी आली जाळ्यात?

Video - Mission Magar : नाग नदीत दिसली मगर, वनविभागाचा महिनाभर शोध; अखेर कशी आली जाळ्यात?
प्रातिनिधीक फोटो

एक जानेवारीला कोल्हापूरच्या वनविभागाचे विशेष पथक या मगरीला पकडण्यासाठी आले. या पथकानं लावलेल्या दोन पिंजऱ्यांमध्ये कोंबडी ठेवली होती. ती कोंबडी खाण्यासाठी शनिवारी रात्री तीन वाजता मगर आली. तेव्ही ती अलगत जाळ्यात अडकली.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 02, 2022 | 5:43 PM

नागपूर : नाग नदीत पावणेदोन महिन्यापूर्वी मगर दिसली होती. पण, ती आहे की, नाही. यावरून संशय येत होता. काहींनी तर मगर असल्याचे व्हिडीओ व्हायरल केले होते. त्यामुळं ही नदीतच आहे. यावर एकमत झाले. नंतर सुरू झाला या मगरीला पकडण्याची मोहीम.

कधी दिसायची तर कधी गायब व्हायची

ही मगर कुठून आली, यावरून चर्चा सुरू झाली. महाराजबागेत असलेल्या मगरीची पिल्ले पुरात वाहून गेली होती. त्यापैकी काही पिल्ले मरण पावली. एक-दोन मगरीची पिल्ले गायब झाली होती. तीच ही मगर असावी, असा अंदाज आहे. पण, नाग नदीत मगर कशी जीवंत राहील, असा संशय व्यक्त केला जात होता. एवढ्या खराब पाण्यात मगर जीवंतच राहणार नाही, असंच बहुतेकांना वाटत होते. तरीही मध्यंतरी ती कुणालातरी दिसायची. नंतर गायब व्हायची. हा लपंडाव सु्रू होता. मगरीला पाहण्यासाठी मध्यंतरी बरीच गर्दी राहायची.

कोंबडी खाण्यासाठी आली नि अडकली

वनविभागानं पुढाकार घेऊन पिंजरे टाकले. त्यातही ती अडकली नाही. शेवटी कोल्हापूरचे टीमला पाचारण करण्यात आले. एक जानेवारीला कोल्हापूरच्या वनविभागाचे विशेष पथक या मगरीला पकडण्यासाठी आले. या पथकानं लावलेल्या दोन पिंजऱ्यांमध्ये कोंबडी ठेवली होती. ती कोंबडी खाण्यासाठी शनिवारी रात्री तीन वाजता मगर आली. तेव्ही ती अलगत जाळ्यात अडकली.

नैसर्गिक अधिवासात सोडणार

आज सकाळी तिला पकडून सेमिनरी हिल्सवरील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरला पाठविण्यात आले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तसेच कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. अशी माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.

पिकअप व्हॅन झाडावर आदळून भीषण अपघात, चौघींचा मृत्यू, पाच जणी गंभीर

Nagpur Crime | भंडाऱ्यातून पळून नागपुरात आले, संसार थाटला; पण, दारूचे व्यसन लागले अन् प्रेमविवाह भंगला!

Nagpur Crime | आमदार भांगडिया यांच्या नातेवाईकावर हल्ला; का केली असेल अज्ञान आरोपींनी मारहाण?

 

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें