AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, काकू शोभा फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?

देवेंद्र फडणवीस उद्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, काकू शोभा फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, काकू शोभा फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 04, 2024 | 8:43 PM
Share

भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे उद्या तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबातही आनंदाचे वातावरण आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याने आनंद व्यक्त केला आहे. “तो मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे याचा आनंद मोठा आहे. कारण त्याची स्वप्न महाराष्ट्राच्या विकासाची आहे. त्याचा विकासाबद्दलचं व्हिजन महत्त्वाचं आहे आणि तो पाच वर्षांमध्ये आपल्या योजना पूर्ण करून आपलं नाव वाढवेल यात काही शंकाच नाही”, अशी प्रतिक्रिया शोभा फडणवीस यांनी दिली.

“आम्ही दोघेही विधानसभेत एकाच वेळी होतो. त्यामुळे आमचं भेटणं, बोलणं रोज व्हायचं. मला एखाद्या विषयावर बोलायचं असेल किंवा त्याला बोलायचं असेल तर आम्ही बोलत होतो. तो राजकारणामध्ये लोकांच्या भावना आणि परिस्थिती जाणून घेतो. त्याच्यामध्ये त्याचा हात कोणी पकडू शकत नाही. राजकारणाचे गुण लहानपणापासून असणे आवश्यक नाही. पण धडाडी आणि राजकारणाची आवड असणे, सुख-दुःख पचवून घेणे इतकी ताकद असणं खूप महत्त्वाचं आहे”, असं शोभा फडणवीस म्हणाले.

‘एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा येतील, असं वाटत नव्हतं’

“लोकसभेत आम्ही जो झटका खाल्ला आणि चार महिन्यात त्याने ज्या लोकांच्या नाड्या ओळखल्या, लोकांना कार्यक्रम दिले, लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या, सगळ्या खेड्यातल्या बहिणी आम्हाला म्हणायच्या, आम्ही देवा भाऊला मतदान करणार. उत्साह वाढलेला होता. त्यामुळे आम्हाला वाटत होतं, आमचं राज्य येईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा येतील, असं वाटत नव्हतं. पण एवढं यश मिळवलं याबद्दल तिघांचं सुद्धा अभिनंदन आहे. हे यश त्यांना पाच वर्ष मोठ्या प्रमाणात मदत करेल. लोकांना न्याय देण्यामध्ये ते यशस्वी ठरतील”, असा दावा शोभा फडणवीस यांनी केला.

शोभा फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

“उद्धव ठाकरे मूळ हिंदुत्वापासून दूर गेले, जे हिंदुत्वापासून दूर आहेत त्यांच्याजवळ ते गेले. त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काम केलं. एकनाथ शिंदे यांना ते सहन झालं नाही आणि ते हिंदुत्व घेऊन आमच्यासोबत आले आणि त्यांनी चांगलं काम करून दाखवलं. देवेंद्रच्या पाठीशी आमच्या शुभेच्छा नेहमी आहेत आणि त्याच्या डोक्यात त्याने जे ठरवायचं ते ठरवलेलं आहे. त्याचा विजय स्पष्ट आहे आणि तो पाच वर्षात मोठा यश मिळवून दाखवेल”, असं देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी सांगितलं.

Follow Us
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
Video: पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
Mumbai Ganpati Visarjan 2026 | लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ; गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम