AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीसांचं मिशन ‘नागपूर महापालिका’, कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी सुरु, जनसंपर्कावर भर

देवेंद्र फडणवीस नागपूर महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जनसंपर्क वाढवला असून कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी गाठी घेणं सुरु आहे.

देवेंद्र फडणवीसांचं मिशन 'नागपूर महापालिका', कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी सुरु, जनसंपर्कावर भर
देवेंद्र फडणवीस
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 1:12 PM
Share

नागपूर: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. देवेंद्र फडणवीस नागपूर महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जनसंपर्क वाढवला असून कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी गाठी घेणं सुरु आहे. फडणवीस यांनी आठवड्यातील दोन दिवस नागपूरमध्ये मुक्काम सुरु केला आहे. भाजपचं मिशन नागपूर मनपा निवडणूक सुरु असून त्यासाठी देवेंद्र फडणवीस अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी सुरु

नागपूर महानगरपालिका निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे, त्यामुळेच भाजपच्या दिग्गज नेत्यांचा नागपुरात जनसंपर्क वाढवलाय. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील जनसंपर्क वाढवलाय. दर आठवड्याचे दोन दिवस फडणवीस नागपूरात मुक्कामी असतात आणि घरी जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत.

आज सकाळपासून नागपूर शहरात फडणवीस यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. आज सकाळी शहरातील सुभाषनगर भागातून फडणवीस यांचा दौरा सुरु झाला. दिवसभर ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.नागपूर महानगरपालीकेत 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे.

भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि गडकरी – फडणवीसांच्या होमपिचवरील महापालिका असल्यानं भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहेत. त्यामुळेच केलेल्या विकास कामांवर भाजप आगामी निवडणूक लढणार आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीकडून निवडणुकीची तयारी

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुकीची तयारी सुरु केलीय. गेल्या पंधरा वर्षांपासून नागपूर महापालिकेत विरोधी पक्षात असणाऱ्या काँग्रेसनं देखील निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रुफल पटेल यांनी देखील नागपूर महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना तयारी लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

इतर बातम्या:

आटपाडी डेपोला कुलुप, आंदोलन सुरुच राहणार, ठाकरे सरकारला इशारा, एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर गोपीचंद पडळकर आक्रमक

क्रुझ ड्रग्जप्रकरणातील इतर सात जणांना जामीन मंजूर, आता सुटकेची प्रक्रिया सुरू

Devendra Fadnavis started the preparation of Nagpur Municipal Corporation election

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....