अतिवृष्टीमुळे राज्यातील धरणं जवळपास निम्मे भरले, आठवड्यात धरणांमध्ये तब्बल 16 टक्के पाणीसाठा वाढला

| Updated on: Jul 28, 2021 | 8:10 AM

अतिवृष्टीमुळे राज्यातील धरणं जवळपास निम्म भरली आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये 48.41 टक्के पाणीसाठा आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यातील धरणं जवळपास निम्मे भरले, आठवड्यात धरणांमध्ये तब्बल 16 टक्के पाणीसाठा वाढला
जोरदार पावसाने राज्यातील धरणं भरण्याच्या मार्गावर
Follow us on

नागपूर : राज्यात गेल्या आठवड्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. पण या संकटात दिलासादायक बातमी म्हणजे अतिवृष्टीमुळे राज्यातील धरणं जवळपास निम्म भरली आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये 48.41 टक्के पाणीसाठा आहे.

आठ दिवसांपूर्वी सर्व धरणांमध्ये सरासरी 32 टक्के पाणीसाठा होता, आठवडाभरातील अतिवृष्टीमुळे 16 टक्के पाणीसाठा वाढून 48 टक्क्यांवर पोहोचलाय. गेल्या वर्षाच्या तुलनेत 9 टक्के पाणीसाठा जास्त आहे, आठवडाभरातील अतिवृष्टीमुळे राज्यातील बऱ्याच भागात पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटलीय.

राज्यातील कुठल्या विभागातील धरणांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

विभाग धरणातील पाणीसाठा

अमरावती 46.15 टक्के
औरंगाबाद 33.73 टक्के
कोकण 58.673 टक्के
नागपूर 36. 46 टक्के
नाशिक 31.27 टक्के
पुणे 64.15 टक्के

एकूण सरासरी पाणीसाठा – 48.41 टक्के

पुण्याचं खडकवासला 100 टक्के भरण्याच्या मार्गावर

मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने पुणे शहरातील चारही धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यातच खडकवासला धरण 100 टक्के भरत आल्यामुळे मागील पहिल्यांदा खडकवासला धरणातून अडीच हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. त्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. शिवाय खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरणे 50 टक्के भरली आहेत.

धरण क्षेत्रांत जोरदार पाऊस

महाराष्ट्रातील बहुतांशी धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होऊन धरणं आता भरण्याचा मार्गावर आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटणार आहे.

(Due to heavy rains, the dams in the state were almost half filled, increasing the water storage in the dams by 16 percent in a week)

हे ही वाचा :

VIDEO: पुणेकरांसाठी मोठी बातमी, खडकवासला 100 टक्के भरण्याच्या मार्गावर, पिण्याच्या पाण्याचं संकट मिटलं

जुन्नरमधील पर्यटनस्थळांवर मज्जाव, कलम 144 लागू करुनही पर्यटकांची गर्दी कायम

डॅम इट! भुशी डॅम परिसरात नाकाबंदी, पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांची धबधब्यांवर गर्दी

पावसाळी सहल महागात, पुण्यात कांचन धबधब्यावर गर्दी, पर्यटकांकडून दंडवसुली